SBI नं ग्राहकांना दिला झटका, ‘या’ स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान SBI Amrit Vrishti FD

SBI Amrit Vrishti FD: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) एफडीसह गुंतवणूकदारांना मोठा झटका दिलाय. एसबीआयनं आपल्या खास एफडी “अमृत सृष्टी” योजनेवरील व्याजदरात कपात केली आहे.

नवीन व्याजदर १५ जून २०२५ पासून लागू होणारत. म्हणजेच आता गुंतवणूकदारांना या योजनेतील ठेवींवर पूर्वीपेक्षा कमी व्याज मिळेल. तथापि, एसबीआयनं इतर नियमित एफडी व्याज दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

भर रस्त्यात ओलांडली मर्यादा! तरुणाने बाईकवर बसलेल्या तरुणीबरोबर केलं धक्कादायक कृत्य, VIDEO होतोय व्हायरल. Girl Video Viral

रिझर्व्ह बँकेनं जूनच्या पतधोरण बैठकीत रेपो दरात ५० बेसिस पॉईंट्सची कपात केल्यानंतर आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि कॅनरा बँकेसह बहुतांश बँकांनी मुदत ठेवींच्या व्याजदरात कपात केली होती.

किती कपात झाली?

अमृत सृष्टी योजनेतील व्याजदरात २५ बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली आहे. सामान्य नागरिकांसाठी ४४४ दिवसांच्या कालावधीवर वार्षिक ६.६ टक्के व्याज दर देण्यात येत आहे. तर पूर्वी हा दर ६.८५ टक्के होता. ज्येष्ठ नागरिक आणि अतिज्येष्ठ नागरिक व्याजदरातील अतिरिक्त लाभासाठी पात्र आहेत.

मूळ सातबारा आणि हस्तलिखित सातबारा यात बदल असल्यास; महसूल विभागाने घेतला हा निर्णय Land Record Satbara Utara

एसबीआयच्या विशेष एफडी योजनेवर ज्येष्ठ नागरिकांना आता वार्षिक ७.१० टक्के दरानं व्याज दिलं जात आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी (८० वर्षे किंवा त्यावरील) ज्येष्ठ नागरिकांना लागू असलेल्या व्याजदराव्यतिरिक्त १० बीपीएसचा अतिरिक्त लाभ देण्यात येईल. या सुधारणेनंतर अतिज्येष्ठ नागरिकांना (वय ८० वर्षे किंवा त्यावरील) आता वार्षिक ७.२० टक्के दरानं व्याज देण्यात येणार आहे.

मुदतीपूर्वी बंद केल्यास काय?

५ लाख रुपयांपर्यंतच्या रिटेल एफडीसाठी मुदतपूर्व पैसे काढल्यास (सर्व मुदतीत) ०.५०% दंड लागू होईल. पाच लाख रुपयांपेक्षा जास्त आणि तीन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या किरकोळ एफडीवर मुदतपूर्व पैसे काढल्यास (सर्व मुदतीत) एक टक्का दंड आकारण्यात येणार आहे.

Bank of Maharashtra चे कर्ज झालं स्वस्त; आता किती टक्के व्याजदर? Bank of Maharashtra Loan

Leave a Comment