सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी नवीन दर पहा | Gold Silver Price

Gold Silver Price: आज देखील सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाली. पण दुसरीकडे चांदीनं आणखी एक नवा इतिहास रचला आहे. सोनं प्रति १० ग्रॅम ९९०१८ रुपये तर चांदी प्रति किलो १०९५५० रुपये दरानं उघडली.

जीएसटीसह, २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १०१९८८ रुपये दरानं विकले जात आहे. तर चांदी प्रति किलो ११२८३६ रुपये दरानं विकली जात आहे. याआधी मंगळवारी चांदी १०९१०० रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर बंद झाली होती.

का वाढताहेत चांदीचे दर?

केडिया कमोडिटीजचे अध्यक्ष अजय केडिया यांच्या मते, इराण-इस्रायलमधील तणाव, रशिया-युक्रेनमधील नवीन तणाव आणि जगभरातील अस्थिरता यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूकीकडे वळले आहेत.

मोफत शौचालय योजनेसाठी ऑनलाइन अर्ज सुरुवात free toilet scheme

सोन्यासोबतच चांदीलाही याचा फायदा होत आहे. त्याच वेळी, कमी पुरवठा आणि वाढत्या औद्योगिक मागणीमुळे चांदीमध्ये बरीच गुंतवणूक केली जात आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) सोने आणि चांदीच्या स्पॉट किमती जाहीर केल्या आहेत. यावर GST चा समावेश नाही. तुमच्या शहरात यामुळे १००० ते २००० रुपयांचा फरक असण्याची शक्यता आहे. IBJA दिवसातून दोनदा दर जाहीर करते. एकदा दुपारी १२ वाजता आणि दुसरे संध्याकाळी ५ वाजता दर जाहीर केले जातात.

कोकणपट्टीसह पुणे, सातारा घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट, विदर्भ मराठवाड्यालाही पाऊस झोडपणार, वाचा IMD चा अंदाज | Maharashtra Weather Update

२२ कॅरेट सोन्याचा दर काय?

आयबीजेएच्या दरांनुसार, २३ कॅरेट सोने देखील १२९ रुपयांनी स्वस्त झालं आणि ते ९८६२२ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं. त्याच वेळी, २२ कॅरेट सोन्याची सरासरी स्पॉट किंमत १२८ रुपयांनी कमी झाली आणि ती ९०७०० रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडली.

१८ कॅरेट सोन्याची किंमत देखील ९६ रुपयांनी स्वस्त झाली आणि ती ७४२६४ रुपये प्रति १० ग्रॅमवर आली. तर, १४ कॅरेट सोन्याची किंमत ७५ रुपयांनी कमी झाली आणि ती ५७९२६ रुपयांवर आली. यामध्ये जीएसटी आणि मेकिंग चार्ज समाविष्ट नाहीत.

महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment