Pan card update तुमच्या जुन्या पॅनला PAN 2.0 मध्ये कसे अपग्रेड करावे? जाणून घ्या

Pan card Update तुम्ही तुमचे जुने पॅन कार्ड नवीन पॅन 2.0 मध्ये अपग्रेड करण्याचा विचार करत आहात का? त्यामुळे आज आम्ही तुम्हाला ते अपग्रेड करण्याचा एक अतिशय सोपा मार्ग सांगणार आहोत. ई-पॅन मोफत मिळू शकतो, तर फिजिकल पॅन कार्डसाठी तुम्हाला नाममात्र शुल्क भरावे लागेल. या साईटवर जाऊन तुम्ही फक्त 9 स्टेप्स फॉलो करून नवीन पॅन कार्ड मिळवू शकता.pan card update

तुम्हाला कल्पना आहे की, पॅन कार्डची कुठेही गरज पडते. अशातच आता नवे पॅन 2.0 आले आहे. या नव्या पॅन 2.0 संदर्भात अनेकांना माहिती नाही. किंवा ज्यांना माहिती आहे त्यांना जुने पॅन हे पॅन 2.0 मध्ये कसे अपग्रेड करावे हे माहिती नाही. तर चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला याचविषयीची माहिती संगणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया.income tax department

भारतात पॅन कार्ड प्रणाली अधिक पुढे नेण्यासाठी आयकर विभागाने काही काळापूर्वी पॅन 2.0 सादर केले आहे. सुरक्षा सुधारणे आणि संपूर्ण प्रक्रिया सुलभ करणे हा त्याचा उद्देश आहे. यात स्कॅनिंग-पात्र QR कोडसह ई-पॅन आहे, जे जलद प्रमाणीकरण प्रदान करते आणि पॅन कार्डशी संबंधित फसवणूक किंवा गैरवापराची शक्यता कमी करते.

या ई-पॅनचे डिजिटल व्हर्जन मोफत उपलब्ध असून ते तुम्हाला ईमेलद्वारे लगेच मिळू शकते. तर नाममात्र शुल्क भरल्यानंतर तुम्ही दिलेल्या पत्त्यावर फिजिकल पॅनकार्ड येते. जर आपल्याकडे आधीपासूनच नियमित पॅन कार्ड असेल ज्यात QR कोड नसेल तर ते अद्याप पूर्णपणे वैध आहे. म्हणजे ते अपडेट करण्याची गरज नाही.

पॅन 2.0 किंवा ई-पॅन कोण जारी करतो?

यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुमच्या पॅन जारी करणाऱ्या एजन्सीची माहिती असणे आवश्यक आहे. देशात पॅन सेवा दोन अधिकृत एजन्सीमार्फत दिली जाते. यामध्ये पहिला क्रमांक प्रोटीयन EGOV टेक्नॉलॉजीज लिमिटेड (NSDL) आहे.

तर दुसरी एजन्सी UTI इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी अँड सर्व्हिसेस लिमिटेड (UTIITSL) आहे. आता कोणत्या एजन्सीने तुम्हाला पॅन कार्ड जारी केले आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या सध्याच्या पॅन कार्डचा बॅक चेक करावा लागेल. त्यानुसार तुम्ही अर्ज करू शकता.

प्रोटिअन (NSDLD) द्वारे पॅन 2.0 कार्ड कसे वापरावे?
यासाठी सर्वप्रथम प्रोटिअनच्या रि-प्रिंट वेबसाइटवर जा.

तुमचा पॅन नंबर, आधार नंबर आणि जन्मतारीख टाका.
घोषणा स्वीकारा आणि “सबमिट” वर क्लिक करा.

मास्क केलेल्या पॅन तपशीलांची पडताळणी करा आणि OTP प्राप्त करण्यासाठी मोबाइल / ईमेल / दोन्ही निवडा.

आता तुम्हाला OTP मिळेल, तो टाका आणि 10 मिनिटांत व्हेरिफिकेशन करा.

यानंतर पेमेंट पेजवर जाऊन अटी स्वीकारा आणि 50 रुपये शुल्क भरा.

पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पावती मिळेल, सेव्ह करा.
24 तासांनंतर तुम्ही तुमचा ई-पॅन डाऊनलोड करू शकता.
फिजिकल पॅन कार्ड 15 ते 20 दिवसांच्या आत तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर पोहोचेल.

Leave a Comment