Grampanchayat Information App:डिजिटल युगाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींच्या कामकाजात पारदर्शकता यावी आणि गावकऱ्यांना थेट माहिती मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने ‘मेरी पंचायत’ अॅप सुरू केलं आहे.
या अॅपच्या माध्यमातून ग्रामस्थांना आपल्या गावातील विकासकामांपासून ते आर्थिक घडामोडींपर्यंतची माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे.
ग्रामपंचायतींच्या कामकाजात पारदर्शकता
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र आणि राज्य शासन ग्रामपंचायतींना थेट निधी उपलब्ध करून देत आहे. मात्र, अनेकदा ग्रामस्थांना या निधीचा वापर कसा होतो, कोणती कामं सुरू आहेत, याची माहिती मिळत नाही. ‘
मेरी पंचायत’ अॅप हे याच समस्येवर उपाय म्हणून सादर करण्यात आलं असून ग्रामपंचायतीचा व्यवहार आता ग्रामस्थांसमोर उघडपणे मांडला जाणार आहे.
अॅपमध्ये काय माहिती मिळेल?
‘मेरी पंचायत’ अॅपवर मिळणारी मुख्य माहिती खालीलप्रमाणे आहे. जसे की,
आपल्या गावातील ग्रामपंचायत सदस्यांची संपूर्ण यादी.
स्थापन झालेल्या समित्यांची माहिती व अध्यक्षांची नावे.
ग्रामपंचायतीने दिलेल्या नवीन सूचना व नोटीसेस.
गावाला मिळालेलं सरकारी अनुदान आणि त्याचा वापर.
कोणत्या योजनेतून कोणती विकासकामं सुरू आहेत.
बँक खात्यांची संख्या आणि खर्चाचे तपशील.
पाण्याचे स्रोत व नळजोडण्या किती आहेत याची माहिती.
प्रत्येक कामासाठी किती खर्च झाला याचा हिशोब.
गावकऱ्यांना फोटोसह अभिप्राय नोंदवण्याची सुविधा
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
या अॅपमध्ये ग्रामस्थांना फोटो अपलोड करून सूचना किंवा तक्रार नोंदवता येणार आहे. एखादं काम निकृष्ट दर्जाचं असेल किंवा चांगलं काम झालं असेल तर त्याबाबतचा फोटो टाकून आपला अभिप्राय नोंदवता येतो. यामुळे स्थानीय पातळीवर जबाबदारीची भावना वाढून चांगल्या प्रशासनाला चालना मिळेल.
कोणत्या कामासाठी किती खर्च?
‘मेरी पंचायत’ अॅपचा एक मोठा फायदा म्हणजे ग्रामपंचायतीचा संपूर्ण आर्थिक लेखाजोखा ग्रामस्थांना उपलब्ध होणार आहे.
कोणत्या कामासाठी किती रक्कम मंजूर झाली, किती खर्च झाला आणि शिल्लक रक्कम किती आहे याची माहिती आता थेट मोबाईलवर मिळू शकते. यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसण्यास मदत होणार आहे.
राज्यात जमिनीच्या तुकडे बंदी कायद्यात सुधारणा, महसूल मंत्र्याची मोठी घोषणा | Land Tukdabandi 2025