DA वाढीचा निर्णय : राज्य कर्मचाऱ्यांना 55%, केंद्र कर्मचाऱ्यांना 58% महागाई भत्ता.DA Hike News

DA Hike News:महाराष्ट्रातील सुमारे 17 लाख राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक तसेच देशभरातील केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सरकारने त्यांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य कर्मचाऱ्यांसाठी 55% महागाई भत्ता

महाराष्ट्र शासनाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा DA 53% वरून 55% पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे. या निर्णयामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारात थोडी वाढ होणार आहे.

या मराठी गाण्यावर नवरीचा जबरदस्त ठेका; VIDEO पाहून म्हणाल…आता फक्त येवढंच बाकी होत Bride dance viral video

सध्या अखिल भारतीय सेवांमधील अधिकाऱ्यांचा DA 55% झाला आहे आणि सामान्यतः त्यांच्या पाठोपाठच राज्य कर्मचाऱ्यांचाही DA वाढवण्यात येतो. त्यामुळे हा निर्णय लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 58% DA ची शक्यता

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा DA जानेवारी 2025 पासून 53% वरून 55% झाला आहे. आता जुलै 2025 पासून आणखी एकदा DA वाढ होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, DA तीन टक्क्यांनी वाढून 58% होऊ शकतो.

HDFC बँकेचे पर्सनल लोन घेण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही मार्ग उपलब्ध.HDFC Bank Personal Loan

DA वाढीचा निर्णय जुलै महिन्याच्या महागाई निर्देशांकावर (All India Consumer Price Index) आधारित असेल. सध्या जानेवारी ते मार्च 2025 चे निर्देशांक जाहीर झाले असून, उर्वरित एप्रिल ते जूनमधील निर्देशांक जाहीर झाल्यावर अंतिम निर्णय होईल.

हा निर्णय दिवाळीच्या सुमारास जाहीर केला जाण्याची शक्यता आहे, परंतु लागू मात्र जुलै 2025 पासून होईल.

राज्य कर्मचाऱ्यांचा DA 1 जानेवारी 2025 पासून 55% होणार.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA जुलै 2025 पासून 58% होण्याची शक्यता.

नवीन वेतन आयोग (8वा वेतन आयोग) जानेवारी 2026 पासून लागू होणार.

विवाहित मुलीला वडिलोपार्जित जमिनीत वाटा मिळतो का? काय आहे नियम? वाचा सविस्तर Daughter Land Property Rights

Leave a Comment