PM Awas Yojana प्रधानमंत्री आवास योजना (PM Awas Yojana) ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. जी गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत देते. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व इतर गरीब कुटुंबांना विशेष प्राधान्य दिलं जातं. मात्र, लाभ मिळवण्यासाठी उत्पन्न मर्यादा आणि काही पात्रता अटी देखील लागू आहेत.PM Awas Yojana
पंतप्रधान घरकुल यादी बघण्यासाठी येथे क्लीक करा
प्रधानमंत्री आवास योजनेच्या (PM Awas Yojana) अधिकृत संकेतस्थळानुसार, आतापर्यंत योजनेंतर्गत 92.61 लाख घरे पूर्ण करण्यात आली आहेत. ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागांमध्ये या योजनेंतर्गत गरजूंना घरे वितरित केली जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पक्कं घर नसणं आवश्यक आहे.PM Awas Yojana
नोंदणीची अंतिम तारीख डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जर तुम्ही नुकतीच अर्ज प्रक्रिया पूर्ण केली असेल आणि जाणून घ्यायचं असेल की, तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे की नाही? तर ऑनलाइन पद्धतीने खालीलप्रमाणे तपासता येईल.PM Awas Yojana
- PM आवास योजनेचा स्टेटस असा तपासा?
Assessment नंबरशिवाय स्टेटस कसा तपासाल? - PMAY ची अधिकृत वेबसाइट उघडा – https://pmaymis.gov.in
Menu > Citizen Assessment या पर्यायावर क्लिक करा
- पुढे Search by Name, Mobile No. इत्यादी दोन पर्याय दिसतील
- ‘Search by Name’ हा पर्याय निवडा
- त्यानंतर आपली माहिती भरा : राज्य, जिल्हा, शहर, अर्जदाराचं नाव, वडिलांचं नाव, मोबाईल नंबर
- Submit बटनावर क्लिक केल्यावर स्क्रीनवर तुमचा स्टेटस दिसेल.
- Assessment नंबर असल्यास स्टेटस कसा तपासाल?
- Citizen Assessment मध्ये जाऊन Assessment ID चा पर्याय निवडा
- तुमचा Assessment नंबर व मोबाईल नंबर टाका
- Submit बटनावर क्लिक करा
- तुमचा अर्ज मंजूर झाला का, ते स्टेटस स्क्रीनवर दिसेल