Maharashtra School Exams Time Table | महाराष्ट्रातील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (SCERT) नवीन परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून, शालेय विद्यार्थ्यांना यावर्षी तीन टप्प्यांत मूल्यांकन चाचण्या द्याव्या लागणार आहेत. (Maharashtra School Exams)
राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे एकसमान वेळापत्रक लागू असणार आहे. पहिली मूल्यांकन चाचणी येत्या 6 ते 8 ऑगस्ट 2025 दरम्यान घेण्यात येणार आहे.
सोमवारी महाराष्ट्र बंद ! सरकारच्या ‘या’ निर्णयाविरोधात मोठा एल्गार Maharashtra closed News 2025
पहिल्या चाचणीचं वेळापत्रक जाहीर :
दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची पहिली पायाभूत चाचणी 6 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या चाचणीचा विषयनिहाय तपशील पुढीलप्रमाणे:
6 ऑगस्ट 2025 – प्रथम भाषा
7 ऑगस्ट 2025 – गणित
8 ऑगस्ट 2025 – तृतीय भाषा (इंग्रजी
या सर्व चाचण्या लेखी स्वरूपात घेतल्या जाणार असून, त्याच दिवशी तोंडी चाचणीही पार पाडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्यास त्यांना दुसऱ्या दिवशी तोंडी चाचणी घेण्याची मुभा राहणार आहे. (Maharashtra School Exams)
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Maharashtra School Exams | प्रश्नपत्रिका वितरण आणि उर्वरित चाचण्या :
प्रश्नपत्रिकांचे वितरण 14 जुलै ते 28 जुलै 2025 या कालावधीत करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शाळांना या कालावधीत प्रश्नपत्रिका दिल्या जातील. परीक्षा शालेय वेळापत्रकानुसार सकाळ किंवा दुपार सत्रात घेण्यात येऊ शकतात. वेळापत्रकामध्ये बदल करायचा असल्यास संबंधित शाळांना SCERT कडून परवानगी घेणे आवश्यक आहे.
संपूर्ण शैक्षणिक वर्षात तीन मूल्यांकन चाचण्या घेतल्या जाणार आहेत:
पहिली चाचणी – ऑगस्ट 2025
दुसरी चाचणी – ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत
तिसरी चाचणी – एप्रिल 2026
या चाचण्या मराठीसह एकूण 10 माध्यमांतील विद्यार्थ्यांसाठी लागू असतील.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा