“बाई, नाचण्याचा हा कोणता प्रकार?” ढोलकीचा ताल अन् रस्त्यावरच लोळू लागल्या महिला…; VIDEO पाहून धराल डोकं.Wedding Barat Dance Viral Video

Wedding Barat Dance Viral Video : लग्नाच्या वरातीत नाचण्याची एक वेगळी मजा असते. त्यात जर घरचं लग्न असेल, तर मग काय विचारायची सोयच नाही. अशा लग्नात भावंडांना कुटुंबासह मनमुराद नाचण्याचा आनंद घेता येतो. लग्नाच्या वरातीतील डान्सचे अनेक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात.

सध्या अशाच एका वरातीतील महिलांच्या डान्सचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्ही कपाळावर हात मारल्याशिवाय राहणार नाही. त्यात तीन महिला एकत्र रस्त्यावर लोळून असा काही डान्स करतात की, पाहणारेही चकित होतात. तर अनेकांना व्हिडीओ पाहून प्रश्न पडलाय की, बाई नाचण्याचा हा नेमका कोणता प्रकार आहे?

वरातील ढोला-ताशा असेल, तर नाचण्याची एक वेगळी मजा असते. ढोलाच्या तालावर प्रत्येक जण डोलू लागतं. काही लोक तर बेभान होत वेड्यासारखे नाचू लागतात. पण, फक्त पुरुष किंवा मुलंच नाही, तर महिलाही वरातीत वेड्यासारखं नाचू शकतात हे दाखविणारा हा व्हिडीओ आहे.

या व्हिडीओत ढोलाच्या तालावर महिला असा काही ठेका धरतात की, त्या चक्क नाचता नाचता रस्त्यावरच लोळू लागतात. यावेळी इतर महिलाही त्यांना टाळ्या वाजवून प्रोत्साहन देतात. अनेक जण महिलांचा हा हटके डान्स पाहून हसू लागतात.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावरून लग्नाची वरात निघाली आहे, यावेळी ढोल-ताशांच्या तालावर पाहुणे मंडळी नाचतायत. याच मंडळींमध्ये दोन महिला ढोलाच्या तालावर नाचता नाचता चक्क रस्त्यावरच लोळू लागतात. रस्त्यावर लोळून लोळून त्या एकापेक्षा एक भन्नाट स्टेप्स करताना दिसतायत, त्या नाचून उठत नाही, तोवर तिसरी एक महिला येते आणि ती सरळ पायाने टेक्नो मारण्यास सुरुवात करते.

हे पाहून उपस्थित महिला जोरजोरात ओरडून टाळ्या वाजवत त्यांना प्रोत्साहन देतात. वरातीतील नाचणाऱ्या महिलांपासून सर्वांचाच चेहरा आनंदाने खुललेला दिसतोय. सोप्या शब्दांत सांगायचे तर, या दोन महिलांनी आपल्या हटके डान्सने वरातील एक वेगळाच माहोल तयार केला.

रस्त्यावर लोळून लोळून नाचतायत महिला

वरातीतील या हटके डान्सचा व्हिडीओ @deepaksing1695 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर युजर्सही भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलेय की, असे दिसते की, या महिलांनी वेगळा डान्स कोर्स केलाय. तर दुसऱ्याने लिहिलेय की, या लोकांचा डान्स अद्भुत आहे आणि त्यांना पाहून इतर महिलाही नाचत आहेत. तिसऱ्याने लिहिलेय की, लोक इतरांपेक्षा आपण काही वेगळे आहोत हे दाखविण्यासाठी काहीही करतात.

रेशनकार्डमधून या ग्राहकांची नावे वगळणार; जाणून घ्या सविस्तर! तुमचे नाव यादीत पहा Ration card ineligible list

Leave a Comment