या कर्मचाऱ्यांना जूनपासून ५३ टक्के महागाई भत्ता” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा DA Hike News

DA Hike News:राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना जूनपासून ५३ टक्के महागाई भत्ता मिळणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. मूळ वेतनावर ५३ टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येईल असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

महागाई भत्ता वाढीमुळे सरकारच्या तिजोरीवर दर महिन्याला १९ कोटींचा आर्थिक भार वाढणार आहे. महागाई भत्त्याच्या थकबाकीबाबत निधीची उपलब्धता पाहून यथावकाश निर्णय घेण्यात येईल, असंही एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं.

एसटी कर्मचाऱ्यांना ५३ टक्के महागाई भत्ता

एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढीचा दर लागू केला आहे. महागाई भत्याची २०१८ पासूनची थकबाकी प्रलंबित आहे.

न्यायालयाने थकबाकी देण्याबाबतचा निर्णय दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी झालेली नव्हती. त्यामुळे आता महागाई भत्ता ५३ टक्के इतका लागू करण्यात आला आहे, अशी घोषणा एकनाथ शिंदेंनी केली.

काय म्हणाले प्रताप सरनाईक

सध्या एसटी महामंडळाच्या अनेक विभागांमध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. अनेक ठिकाणी चांगले शिक्षण अधिकारी आवश्यक असून विशेषतः भविष्यात पीपीपी तत्त्वावर विकसित होणाऱ्या एसटीच्या जागे बाबतीत बांधकाम विभागाकडे कुशल अभियंत्यांची गरज भासणार आहे.

राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी : वित्त विभागाकडून सुधारित वेतनश्रेणी संदर्भात शासन निर्णय GR जारी दि. :- 02/06/2025 | Government decision regarding revised pay scale

त्यामुळे सध्या रिक्त असलेल्या अभियंत्यांच्या जागा करार पद्धतीने आणि सरळ सेवा भरतीच्या माध्यमांतून भरण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

नव्या नोकर भरतीच्या अनुषंगाने एसटीच्या प्रत्येक खात्यांनी आपल्या विभागातील रिक्त पदांचा फेर आढावा घेऊन आवश्यक असणाऱ्या पदांची भरती करणे संदर्भात एकत्रित मागणी सादर करावी, असे निर्देश संबंधित देण्यात आल्याची माहिती यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

एसटीच्या सक्षमीकरणासाठी कुशल मनुष्य बळाबरोबरच तांत्रिकदृष्ट्या सक्षम अधिकाऱ्यांची भविष्यात एसटीला गरज भासणार असून त्या अनुषंगाने भारती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचंही प्रताप सरनाईक म्हणाले आहेत.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment