सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याची हौस अनेकांच्या जीवावर बेतू शकते हेच अशा प्रकारे अल्पावधीत प्रसिद्ध होण्याचा नाद लागलेल्यांना कळतच नाही. अनेकांना वाटतं की, आपण काही विचित्र केलं की चर्चेत येऊ आणि व्हायरल होऊ. आणि तसंच काहीसं चित्र पुन्हा समोर आलं आहे. काही सेकंदांचा व्हिडीओ, थोडेसे लाइक्स व व्ह्युज मिळविण्यासाठी लोक कोणताही विचार न करता, स्वतःचा आणि इतरांचाही जीव धोक्यात घालतात. असाच एक धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील लखनऊ–कानपूर हायवेवर घडला असून, त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ लखनऊ–कानपूर येथील हायवेवरील आहे. रात्रीच्या वेळी वेगानं धावणाऱ्या गाड्या, ट्रक अशा रस्त्याच्या मधोमध दोन तरुणी अचानक थांबून ‘नागिन’ डान्स करताना दिसत आहेत. कोणताही कार्यक्रम नाही, स्टेज नाही, सुरक्षा नाही; फक्त हायवे आणि सोशल मीडियावर व्हायरल होण्याची हौस.
व्हिडीओमध्ये दोन तरुणी कधी रस्त्यावर बसून, कधी चक्क झोपून, तर कधी विचित्र हालचाली करत ‘नागिन’ डान्सच्या स्टेप्स करताना दिसतात. एक तरुणी जमिनीवर बसली आहे आणि दुसरी तिच्या समोर उभी राहून डान्स करते, हे दृश्य पाहून अनेक जण हादरले आहेत. आजूबाजूनं वाहनं जात असतानाही या तरुणींना कसलीही भीती वाटत नसल्याचं दिसून येत आहे. एखाद्या वाहनचालकाचं थोडंसं जरी वाहनावरून नियंत्रण सुटलं असतं, तर मोठा अपघात झाला असता; पण लाइक्स आणि व्ह्युजच्या नादात हा धोका जणू त्यांना छोटा वाटत असेल.
New update | येणार ? शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! | जाणून घ्या सविस्तर