बापाचं प्रेम! लंडनला जाणाऱ्या लेकीबरोबर ठेवलेला व्हॉट्सअॅप स्टेटस शेवटचा ठरला; अनेक धक्कादायक व्हिडिओ आले समोर Ahmedabad plane crash Viral Video

Ahmedabad plane crash Viral Video: अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान एआय-171 चा अपघात झाला आहे. या विमानात एकूण २४२ प्रवासी अहमदाबादहून लंडनला जात होते. मात्र या अपघातात फक्त एक प्रवासी वगळता इतर सर्वांचाच मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, आता याच विमानात प्रवास करणाऱ्या खुशबू नावाच्या नवविवाहित महिलेची काळीज पिळवटून टाकणारी माहिती समोर येत आहे.

मोठी बातमी २४२ प्रवासी असलेले एअर इंडियाचे विमान अहमदाबादमध्ये कोसळले; परिसरात धुराचे मोठे लोट धक्कादायक व्हिडिओ समोर.Air India passenger aircraft crashes Live Updates

लग्नानंतर पाच महिन्यांनी ती तिच्या पतीला भेटायला जात होती. मात्र मध्येच विमान अपघाताच्या रुपात तिच्यावर काळाने घाला घातला. दरम्यान खूशबूला एअरपोर्टवर सोडायला आलेल्या वडिलांनी तिच्यासोबत एक फोटो काढला होता त्यानंतर तो व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवला..अन् काही क्षणातच हा व्हॉट्सअॅप स्टेटस शेवटचा ठरला. याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून वाचून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल.

या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, खूशबूच्या वडिलांनी खूशबूला एअरपोर्टवर सोडायला आले तेव्हा तिच्यासोबत एक फोटो काढला होता त्यानंतर तो व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवला. यावेळी त्यांनी “आशिर्वाद खूशबू बेटा…गोईंग टू लंडन” असं फोटोखाली लिहलं होतं. यावरुन कळतंय की खूशबू लंडनला निघालेली याचा वडिलांनी किती आनंद झाला होता. वडिलांचं मुलीवरचं प्रेम काय असतं हे वेगळं सांगायची गरज नाही. मात्र ज्या लेकीच्या भविष्याची स्वप्न एक बाप रंगवत होता त्याचा असा शेवट होईल असा कुणी विचारही केला नसेल.

खुशबू एक नवविवाहिता याच विमानात होती. खुशबू मुळची राजस्थानच्या बलोतारा जिल्ह्यातली. तिचं लग्न याच वर्षी जानेवारी महिन्यात मनफुल सिंग याच्याशी झालं होतं. तिचा पती लंडनमध्ये शिकतो आहे. ती त्याला भेटण्यासाठी पहिल्यांदाच याच विमानाने लंडनला चालली होती. लग्नानंतर या दोघांची पहिल्यांदाच भेट होणार होती पण त्याआधीच खुशबूचा विमान अपघातात मृत्यू झाला. यावेळी तिच्या वडिलांनी ठेवलेलं व्हॉट्सअॅप स्टेटसची सर्वत्र चर्चा आहे.

पुढील 5 दिवस ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पंजाब डख यांचा मोठा इशारा! Punjabrao Dakh Hawaman Andaaj

Leave a Comment