तुम्ही बरेच व्हिडीओ पाहिले असतील. पण हा एक असा व्हिडीओ, जो पाहिल्यावर तुम्हाला धडकी भरेल. ड्रायव्हिंग करता करता रस्त्यात असं काही घडलं की तुमच्या अंगावर काटा येईल. व्हिडीओ सुरू होऊन पाच सेकंद सुरू होत नाही तोच…असं काही घडतं की कुणी विचारही केला नव्हता. कितीही अनुभवी ड्रायव्हर असला तरी घाटात गाडी चालवणे म्हणजे रिस्क आलीच. कधी कोणतं वळण येईल आणि थेट गाडी दरीत जाईल याचा नेम नसतो. त्यामुळे घाटात गाडी सावकाश चालवण्याचा सल्ला दिला जातो. तसेच मोठ्या गाड्यांपासून शक्य तितकं लांब राहून रायडिंग करा. कारण, एखाद्या गाडीचा ब्रेक फेल झाला, तर तुमची खरंच पंचायत होऊ शकते.
याचंच उदाहरण देणारा एक व्हिडीओ समोर आलाय. एक महिला घाटातल्या रस्त्यावर स्कूटी चालवत होती. पण तिच्या पुढे चाललेला ट्रक अचानक थांबला आणि काही क्षणातच वेगानं मागे घसरू लागला. पाहता पाहता त्या ट्रकनं पाठीमागे असलेल्या स्कूटीला पार चिरडून टाकलं.
एक तरुणी मृत्यूपासून इंचभरच दूर होती; पण तिचे नशीबही तितकेच बलवान होते. मृत्यूला स्पर्श करून ती परत आली. व्हायरल होण्याऱ्या व्हिडीओमध्ये एक मुलगी अगदी मृत्यूच्या दारात होती; पण म्हणतात ना काळ आला होता, वेळ नाही. याच बाबीचा प्रत्यय हा व्हिडीओ पाहून यतो.व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ट्रक पाठीमागे येऊ लागताच स्कूटीवरील महिला घाबरली. जीव वाचवण्यासाठी तिनं स्कूटी सोडून पळ काढला. काही क्षणांतच ट्रकनं स्कूटीला चिरडत पुढे धाव घेतली आणि थेट एका झाडाला जाऊन आदळला.ही घटना नेमकी कुठे घडली आहे, याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण हा अपघात मात्र पाहताना भयंकर वाटतो.
ration card holders | ‘या’ रेशन कार्ड धारकांना आता दरमहा ₹2000 थेट खात्यात जमा होणार