बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी | Bank Holidays July

Bank Holidays July : जर तुम्ही जुलै महिन्यात बँकेत जाण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे! जून महिन्याप्रमाणेच जुलै २०२५ मध्येही बँकांना अनेक सुट्ट्या असणार आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वार्षिक सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार, येत्या महिन्यात सण, शनिवार आणि रविवार मिळून एकूण १३ दिवस बँका बंद राहतील.

या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये वेगवेगळ्या दिवशी असू शकतात, त्यामुळे बँकेत जाण्यापूर्वी आपल्या शहरातील सुट्टीची एकदा खात्री करून घेणे आवश्यक आहे.

प्री- वेडिंगचा जीवघेणा थरार! लोणावळ्यातील खोल दरीत बांधलेल्या स्पेस नेटवर बसले अन्…; VIDEO पाहून काळजात भरेल धडकी.Couple Pre Wedding Shoot Viral Video

जुलै महिन्यातील बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी

३ जुलै: खारची पूजा – आगरतळा येथे बँका बंद.

५ जुलै: गुरु हरगोबिंद जी जयंती – काही राज्यांमध्ये बँका बंद राहतील.

६ जुलै: रविवार – साप्ताहिक सुट्टी.

१२ जुलै: महिन्याचा दुसरा शनिवार – देशभरात बँका बंद.

१३ जुलै: रविवार – साप्ताहिक सुट्टी.

१४ जुलै: बेह देंखलाम – काही राज्यांमध्ये बँका बंद राहतील.

१६ जुलै: हरीला सण – काही राज्यांमध्ये बँका बंद राहतील.

१७ जुलै: यू तिरोट सिंह पुण्यतिथी – शिलाँगमध्ये बँका बंद.

१९ जुलै: केर पूजा – आगरतळा येथे बँका बंद.

२० जुलै: रविवार – साप्ताहिक सुट्टी.

२६ जुलै: महिन्याचा चौथा शनिवार – देशभरात बँका बंद.

२७ जुलै: रविवार – साप्ताहिक सुट्टी.

२८ जुलै: द्रुकपा त्से-जी – गंगटोक येथे बँका बंद.

गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा तेही मोबाईलवर | Mp land records

या सुट्ट्या राज्यानुसार आणि सणानुसार बदलू शकतात. त्यामुळे, बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा स्थानिक शाखेत जाऊन अधिक अचूक माहिती मिळवणे नेहमीच उत्तम राहील.

बँक बंद असली तरी ‘या’ सुविधा सुरु राहतील!जरी बँक शाखा बंद असल्या तरी, तुमच्यासाठी काही बँकिंग सुविधा नेहमीप्रमाणे चालू राहतील.

तुम्ही मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग , एटीएम किंवा UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) यांसारख्या डिजिटल माध्यमांद्वारे आर्थिक व्यवहार सहजपणे करू शकता.

पैशांचे हस्तांतरण, बिल भरणे, बॅलन्स चेक करणे यासारखी कामे तुम्ही घरबसल्या करू शकाल.

घरकुल योजना ग्रामीण लिस्ट जारी आता पहा यादीत नाव Gharkul Yojana Rural List

Leave a Comment