Cotton Cultivation : खरीप हंगामाला महिनाभरात सुरुवात होत आहे. राज्यातील अनेक भागात कापसाची लागवड केली जाते. अलीकडे कापसाचे क्षेत्र वाढत आहे.
खरीप हंगामात (२०२५-२६) कापसाच्या बियाण्यांची विक्री किंमत निश्चित करण्यात आली आहे. कापसाच्या ४७५ ग्रॅम वजनाच्या बीजी-१ च्या पाकिटासाठी ६३५ रुपये व बीजी-२ साठी ९०१ रुपये किंमत निश्चित केली असून तसे राजपत्र भारत सरकारने प्रसिद्ध केले आहे. यापेक्षा अधिक दराने विक्रेत्यांना कापसाचे बियाणे विकता येणार नाही. गतवर्षीपेक्षा प्रति पाकिटामागे यंदा ३७ रुपये दर वाढले आहेत.
खरीप हंगामाला महिनाभरात सुरुवात होत आहे. राज्यातील अनेक भागात कापसाची लागवड केली जाते. अलीकडे कापसाचे क्षेत्र वाढत आहे. यंदाही (२०२५-२६) कापसाचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज धरुन कृषी विभागाकडून नियोजन केले जात आहे. राज्यात बहुतांश भागात बीजी-२ बियाणांची शेतकरी लागवड करण्याला प्राधान्य देत आहेत.
यंदाच्या हंगामासाठी कापसाच्या ४७५ ग्रॅम बियाणे पाकिटाची निविष्ठा विक्रेत्यांसाठी विक्री किंमत निश्चित करणारे राजपत्र भारत सरकारने प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार बीजी-१ च्या पाकिटासाठी ६३५ रुपये आणि बीजी-२ साठी ९०१ रुपये किंमत निश्चित केलेली आहे. गेल्यावर्षी हे पाकीट ८६४ रुपयाला होते, म्हणजे गतवर्षीपेक्षा (२०२३-२४) बीजी-२ कापसाच्या प्रति पाकिटाची किंमत २७ रुपयांनी वाढली आहे. २०२२-२३ या हंगामात या पाकिटाची किंमत ८५३ रुपये होती.
कापूस लागवड सुरू झाली की मागणी असलेल्या कापसाच्या काही वाणांची अधिक दराने विक्री केली जात असल्याचा अनुभव आहे. त्यात बनावट बियाणे विक्री होण्याचीही शक्यता असते. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी शासनाने ठरवलेल्या किमतीपेक्षा अधिक दर देऊ नये, अधिकृत निविष्ठा विक्री दुकानातूनच खरेदी करावी आणि पक्की पावती घ्यावी, असे कृषी विभागाकडून वारंवार आवाहन केले जात आहे.
दारावर, ऑनलाइन खरेदी करुन नये
कापसाचा हंगाम सुरू झाला की बियाणे विक्रीचे फंडे सुरू होतात. काही लोक थेट दारावर येऊन मागणी असलेल्या बियाण्यांची थेट शेतकऱ्यांना विक्री करतात. याशिवाय बाजार दरापेक्षा कमी दराने विक्री करतात.
सध्या अधिक प्रभाव असलेल्या सोशल माध्यमातूनही ऑनलाइन बियाण्यांची विक्री होण्याची शक्यता दिसतेय. या बाबत शेतकऱ्यांनी सजग राहावे. अशा पद्धतीने अजिबात खरेदी करू नये. तसा प्रकार आढळला तर कृषी विभागाशी संपर्क करावा, असे अहिल्यानगरचे जिल्हास्तरावरील भरारी पथकाचे प्रमख, कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे यांनी सांगितले.
Land Record शेतजमिनीच्या खरेदीसाठी आता मोजणीचा नकाशा व चर्तुःसीमा कायम करण्याचा नियम लागू