Crocodile vs Python Deadly Clash | शिकार करो या शिकार बनो! मगर-अजगराची झुंपली जीवघेणी लढत; काही क्षणांत झाला एकाचा शेवट…काळजाचा थरकाप उडवणारा Video Viral

सरपटणाऱ्या प्राण्यांच्या जगात सर्वात भयंकर आणि दहशत माजवणारे दोन शिकारी म्हणजे मगर आणि अजगर. दोघांची ताकद, स्वभाव आणि हल्ल्याची शैली एकदम वेगळी आहे. मगरीच्या जबड्यात जर कोणी एकदा सापडले तरी त्यातून सुटणे अशक्य असते. तर अजगरही आपल्या भल्यामोठ्या देहाने भक्ष्याला आवळून शिकार करतो. दोन्ही हिंस्र प्राणी आपल्या भयावह शिकारीसाठी ओळखले जातात पण जेव्हा अशा दोन जबरदस्त शिकाऱ्यांमध्ये जेव्हा लढत जुंपते तेव्हा ते दृश्य अंगावर काटा आणणारे असते. अशाच एका मगर अन् अजगराच्या भीषण लढाईचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे. या सामना इतका क्रूर होता की काही मिनिटांतच एका प्राण्याचा खेळ संपला.

 

मगर-अजगराची जीवघेणी लढत (Deadly Face-off of Two Predators)

इंटरनेटवर सरपटणाऱ्या प्राण्यांच्या हल्ल्यांचे अनेक व्हिडिओ दिसतात, पण हा व्हिडिओ त्यापैकी अत्यंत खास आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, पाण्याजवळ दबा धरून बसलेली मगर क्षणात एका अजगरावर झडप घालते. अजगरला प्रतिकाराची संधीही मिळत नाही. मगरच्या जबड्याच्या जबरदस्त पकडीत अजगर अडकतो. जी जीव वाचवण्यासाठी अटोकाट प्रयत्न करताना दिसतो पण मगरची जकड इतकी भयंकर असते की अजगरला एकदाही बचावसाठी हल्ला करता येत नाही आणि काही क्षणांतच त्याचा अंत होतो.

 

Video तुफान Viral (Video Takes Social Media by Storm)

Senior Citizen news today | या वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना एक नवीन भेट मिळणार, जेष्टांसाठी मोठी बातमी. 

हा ४० सेंकंदांचा व्हिडिओ X (ट्विटर) वर @AmazingSights या अकाऊंटवरून २८ नोव्हेंबर रोजी पोस्ट झाला. व्हिडिओला ६ लाखांहून अधिक व्ह्यूज आणि ७ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले होते. व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले – “जंगलातील खरा शक्तीप्रदर्शनाचा संग्राम हा असाच असतो.” दुसऱ्याने म्हटले – “निसर्ग खरे युद्ध दाखवते, फिल्मी नाही.”

 

इथे पहा व्हायरल व्हिडिओ 

 

Leave a Comment