Desi Jugad । शेतकऱ्याने बनविले भन्नाट जुगाड! पीक नष्ट करणाऱ्या भटक्या जनावरांसाठी शोधला उपाय; व्हिडीओ एकदा बघाच

Desi Jugad । आपल्या देशातील बहुतांश लोक शेतीवर अवलंबून आहेत. आपला उदरनिर्वाह करण्यासाठी लोक विविध प्रकारची शेती करतात, परंतु आज आम्ही तुम्हाला अशा देशी तंत्रज्ञानाबद्दल सांगत आहोत, जे शेती करताना तुमच्या मोठ्या समस्या सहज सोडवू शकतात.

प्रत्येक व्यक्तीला भटक्या जनावरांच्या समस्येला तोंड द्यावे लागते. भटक्या जनावरांमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीक नष्ट होण्याची देखील शक्यता असते. पण असाच एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

ज्यामध्ये शेतकऱ्याची मेहनत दाखवण्यात आली आहे. या व्हिडीओमध्ये एका शेतकऱ्याने असा जुगाड बनवला आहे ज्याचा उपयोग भटक्या प्राण्यांपासून सुटका करण्यासाठी केला जात आहे.

शेतकऱ्याने बनविले भन्नाट जुगाड

या व्हिडिओमध्ये शेतकऱ्याने प्राणी आणि पक्ष्यांना शेतापासून दूर ठेवण्यासाठी एक उपकरण बनवले आहे. शेतकऱ्याने पंख्याला लाकडाच्या आधाराला बांधले आहे, ते तुम्ही पाहू शकता. आवाजासाठी त्यामागे धातूचे भांडे ठेवण्यात आले आहे. याच्या आवाजामुळे जनावर तुमच्या शेतामध्ये पाऊल देखील ठेवू शकणार नाही.

आता फक्त ओळख क्रमांक सांगा; ७/१२, ८ अ नको अॅग्रिस्टॅक हीच राज्यातील शेतकऱ्यांची झाली ओळख Land Agriculture News

व्हिडिओमध्ये, भटके प्राणी आणि पक्ष्यांना शेतापासून दूर ठेवण्यासाठी एक आश्चर्यकारक युक्ती अवलंबण्यात आली आहे. शेतकऱ्याने पंख्याला लाकडी आधाराने बांधले आहे आणि आपण पाहू शकता की, आवाजासाठी त्याच्या मागे एक धातूचे भांडे ठेवले आहे. हवा वाहते तेव्हा पंख्यामागील धातू आवाज करते. त्यामुळे शेतकऱ्याला शेतात पहारा ठेवण्याची गरज नाही कारण आवाज ऐकताच पशु-पक्षी पळू लागतात.

हा व्हिडिओ यूट्यूब शॉर्ट्सवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ एमडी गुरु नावाच्या चॅनलवर शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक शेतकऱ्यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठमोळ्या तरुणींनी केला भन्नाट डान्स; अदा पाहून प्रेक्षकही झाले फिदा, VIDEO ची संपूर्ण सोशल मीडियावर चर्चा Dance Viral video

Leave a Comment