Funeral Procession Viral Video : तुम्ही आतापर्यंत हळदी समारंभ किंवा लग्नाच्या वरातीतील लोकांना डीजेच्या तालावर थिरकताना पाहिले असेल; पण एखाद्या अंत्ययात्रेत डीजेच्या तालावर लोकांना नाचताना पाहिलं आहे का, हा प्रश्न वाचून तुम्हाला हसू येईल; पण एका अंत्ययात्रेत खरंच असं दृश्य पाहायला मिळालं.
ज्यात अंत्ययात्रेदरम्यान तिरडी हार-फुलं अन् फुग्यांनी सजवण्यात आली होती. तर उपस्थित लोक डीजेच्या तालावर चक्क नाचत होते. अनेकांना हा व्हिडीओ पाहून प्रश्न पडला की, अरे, ही अंत्ययात्रा आहे की लग्नाची वरात. सध्या या अनोख्या अंत्ययात्रेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
डीजेच्या तालावर नाचतायत लोक
व्हिडीओत पाहू शकता की, अंत्ययात्रेसाठी संपूर्ण गाव जमा झालं आहे. यावेळी सर्वच जण डीजेवर खूप नाचतायत. लोकांच्या चेहऱ्यावर इतका आनंद आहे की, पाहून वाटतं की, ही अंत्ययात्रा नाही तर कोणाच्या तरी लग्नाची वरात आहे.
व्हिडीओमध्ये दिसतंय की, अंत्ययात्रेत तिरडी रंगीबेरंगी फुगे, हार-फुलांनी सजवण्यात आलीय. चार जण खांद्यावर घेऊन ही तिरडी जात आहेत. त्याच वेळी तिरडीच्या पुढे गावातील शेकडो लोक डीजेच्या तालावर आनंदाने नाचत आहेत. पण, व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
सावधान! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा जोरदार पावसाचा इशारा IMD Rain Alert Today
इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ @momindian17 नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, जो आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ज्यावर युजर्सही वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी हा व्हिडीओ फार मजेदार असल्याचं म्हटलं आहे; तर काहींनी ही एक परंपरा असल्याची माहिती दिली आहे.
व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले, “आजीने शतक ठोकल्यासारखे दिसते.” दुसऱ्या युजरने म्हटले, “अशी कृत्ये करा की, तुमच्या मृत्यूनंतर संपूर्ण गाव आनंदी होईल.”
तिसऱ्या युजरने म्हटले, “चेष्टा करू नका… खरं म्हणजे आजी १२० वर्षांची झाली होती… म्हणून तिला आनंदानं निरोप देण्यात आला.” शेवटी एका युजरने म्हटले, “जेव्हा कोणी १०० वर्षांहून अधिक काळ जगतो तेव्हा त्याला भव्य निरोप दिला जातो.”