Funny dance video: स्वत:च्या लग्नात असं कोण नाचते?’ नवरदेवाचा विचित्र डान्स पाहून ओशाळली नवरी, Viral Video पाहून नेटकऱ्यांना आवरेना हसू

लग्न म्हणजे आनंद, उत्साह आणि आठवणींचा क्षण. प्रत्येक जोडपं आपल्या लग्नाला खास बनवण्यासाठी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतं. कुणी खास एंट्री घेतं, कुणी गाणं गातं, तर कुणी स्टेजवर धमाल डान्स करतं. पण, कधी कधी ही धमाल इतकी भन्नाट असते की, सगळ्यांचं लक्ष फक्त त्या क्षणाकडे वळतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात नवरदेवाचा ‘खतरनाक’ डान्स पाहून सर्वच दंग झाले आहेत.

Ladki Bahin Yojana  |  लाडकी बहीण योजना आनंदाची बातमी आली! नोव्हेंबर चे 3000 पण आले

हा व्हिडीओ एका लग्नसोहळ्यातील आहे. @mr.nadan_parinda नावाच्या इन्स्टाग्राम हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये स्टेजवर नवरी-नवरदेव आणि दोन्ही कुटुंबांतील काही सदस्य उभे दिसत आहेत. नवरीची एंट्री झाल्यानंतर नवरदेव अचानक जुबिन नौटियालच्या लोकप्रिय गाण्यावर “मेरी जिंदगी है तू” यावर डान्स करायला सुरुवात करतो. त्याचा डान्स पाहून नवरी तर लाजतेच; पण तिच्या मैत्रिणी आणि नातेवाईक मात्र मोठ्याने ओरडू लागतात. नवरदेवाच्या हालचाली आणि त्याचा आत्मविश्वास पाहून सगळेच थक्क होतात. काहींना तो डान्स आवडतो, तर काहींना वाटतं की, तो थोडा जास्तच ओव्हर झाला.

Nuksan Bharpai Anudan Status | 8500 रू, 10000 रु हेक्टरी अनुदान मिळाले नाही या 3 गोष्टी चेक करा 

व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की, नवरदेव आपल्या लग्नाच्या स्टेजवर अगदी उत्साहाने नाचतो आहे. तो ज्या पद्धतीने नाचत आहे त्याची लाज देखील त्याला वाटत नाही उलट तो इतक्या आत्मविश्वासाने नाचतो की, ते पाहून लोकांनाही हसू आवरत नाही. नवरी चकित झालेली दिसते; पण ती तिच्या चेहऱ्यावरील हास्य लपवू शकत नाही. या व्हिडीओनं इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला असून, हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

 

पाहा व्हिडिओ

 

Leave a Comment