बापरे! क्षणात निसर्गाने खेळ केला! अचानक पूर आला आणि क्षणात सहा तरुणी वाहून गेल्या, पाहा जीवाची धडकी भरवणारा VIDEO | Girls Swept Away Waterfall Flood

Girls Swept Away Waterfall Flood: निसर्गासोबत खेळणं नेहमीच धोक्याचं ठरतं आणि पावसाळ्यात तर प्रत्येक क्षण जीवघेणा ठरू शकतो. पर्यटनाच्या उत्साहात भिजणं, साहसी फोटो काढणं अनेकांना थरारक वाटतं; पण कधी कधी हे थरारच आयुष्यभराचं दुःख बनतात. सध्या अशाच एका धबधब्याजवळ घडलेली हृदयद्रावक घटना समोर आली आहे, जिथे क्षणभरातच आनंदात भिजणाऱ्या सहा मुली पाण्याच्या प्रवाहात वाहून जातात…आणि पुढचं दृश्य अंगावर शहारा आणणारं आहे.

निसर्ग जितका सुंदर आणि शांत दिसतो, तितकाच तो अचानक क्रूर आणि रौद्र रूपही धारण करू शकतो आणि हेच एक व्हायरल व्हिडीओ पुन्हा सिद्ध करीत आहे. सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही तरुण मुली एका झऱ्याजवळ मजा करत असताना क्षणार्धात घडलेली भीषण दुर्घटना पाहायला मिळते. पाच सेकंदांत निसर्गानं आपलं खरं रूप दाखवलं आणि आनंदी क्षणांचं रूपांतर जीवघेण्या क्षणात झालं.

मागील दोन वर्षातील पिक नुकसान भरपाईचे पैसे आले; लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार pik nuksan bharpai

नेमकं काय घडलं?

हा प्रकार बिहारमधील गया जिल्ह्यातील ‘लंगुराही वॉटरफॉल’ परिसरातील आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काही तरुणी आणि मुलं वॉटरफॉलजवळ मजा करीत आनंद घेत होते. वातावरण निसर्गरम्य होतं, पावसाच्या हलकाशा सरी आणि थंड वारा… पण काही क्षणांतच वातावरणाचं हे रूप बदललं आणि वॉटरफॉलमध्ये अचानक मोठा पूर आला. झपाट्यानं आलेल्या त्या वेगवान जलप्रवाहांनी तिथे असलेल्या सहा मुलींना वाहून नेलं.

सगळं घडलं डोळ्यांसमोर!

या घटनेचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोकांच्या डोळ्यांसमोर ही दुर्घटना घडली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही तरुणांनी कोणतीही भीती न बाळगता, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धबधब्याच्या खवळलेल्या पाण्यात उडी घेतली. त्यांचं हे धाडस खरंच स्तुत्य होतं. त्यांनी धरणीवरील देवदूतासारखं काम करत, पाण्यात वाहत गेलेल्या मुलींना एकामागून एक बाहेर काढलं.

या थरारक घटनेत एका मुलीला डोंगरावरून आलेल्या मोठ्या दगडाचा धक्का बसला आणि ती गंभीर जखमी झाली. तिच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, या प्रसंगात एकाही मुलीचा जीव गेला नाही. इतर सर्वजणी सुरक्षित असून, जरी धक्का मोठा असला तरी धाडसी मदतीमुळे त्यांना दुसरं आयुष्य मिळालं.

नेटकऱ्यांकडून चिंता व्यक्त

हा व्हिडीओ X (माजी ट्विटर)वर हजारो लोकांनी पाहिला असून, त्यावर कमेंट करीत अनेकांनी पावसाळ्यामध्ये धोकादायक ठिकाणी जाणं टाळा, असा सल्ला दिला आहे. काहींनी लिहिलं, “निसर्गासोबत खेळण्याचा प्रयत्न करू नका, तो क्षमा करत नाही.” तर इतरांनी म्हटलं, “अशा ठिकाणी सुरक्षिततेसाठी कठोर नियम हवेत.”

Leave a Comment