सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर? Gold Silver Price 25 June

Gold Silver Price 25 June: इराण-इस्रायलमधील शस्त्रसंधीचा परिणाम सराफा बाजारावर दिसून येत आहे. शेअर बाजार पुन्हा तेजी दिसू लागताच, सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या किमती घसरू लागल्यात.

इराण-इस्रायलमधील शस्त्रसंधीचा परिणाम सराफा बाजारावर दिसून येत आहे. शेअर बाजार पुन्हा तेजी दिसू लागताच, सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या किमती घसरू लागल्यात.

आज, म्हणजेच बुधवार, २५ जून रोजी, २४ कॅरेट सोनं प्रति १० ग्रॅम ११२ रुपयांनी स्वस्त झालं आणि ते ९७१५१ रुपयांवर उघडले.

लाडक्या बहि‍णींना जून-जुलैचा हप्ता एकत्र येणार? खात्यात ₹ ३००० होणार जमा! यादीत नाव पहा | Ladki Bahin Yojana June-July Installment

तर, चांदी ३१७ रुपयांनी घसरून १०५६५० रुपये प्रति किलो झाली आहे. तर २४ कॅरेट सोनं जीएसटीसह १०००६५ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं विकले जात आहे, तर चांदी १०८८१९ रुपये प्रति किलो दरानं विकली जात आहे.

२२ कॅरेटचा भाव काय?

आयबीजेएच्या दरांनुसार, २३ कॅरेट सोनंदेखील ११२ रुपयांनी स्वस्त झालं आणि ते ९६७६२ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं. त्याच वेळी, २२ कॅरेट सोन्याची सरासरी स्पॉट किंमत १०३ रुपयांनी कमी होऊन ८९९९० रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडली.

१८ कॅरेट सोन्याची किंमत देखील ८४ रुपयांनी स्वस्त झाली आणि ती ७२८६३ रुपये प्रति १० ग्रॅमवर आली आहे.

तुमच्या ग्रामपंचायतीने कुठे किती खर्च केला? या पद्धतीने घरबसल्या मोबाईलवर मिळवा माहिती | Grampanchayat Information App

तर, १४ कॅरेट सोन्याची किंमत ६६ रुपयांनी कमी होऊन ५६८३३ रुपये प्रति १० ग्रॅमवर आली आहे. यामध्ये जीएसटी आणि मेकिंग चार्ज समाविष्ट नाहीत.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) सोने आणि चांदीचे स्पॉट रेट जाहीर केलेत. यावर GST लागू नाही.

तुमचा CIBIL स्कोअर खराब आहे आणि बँक तुम्हाला कर्ज देत नाहीये, जाणून घ्या हे उपाय CIBIL Score Solution

तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असण्याची शक्यता आहे.

IBJA दिवसातून दोनदा दर जाहीर करते. एकदा दुपारी १२ वाजता आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी ५ वाजता दर जाहीर केले जातात.

सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे? हे एका मिनिटात दाखवतो छोटासा टॉवेल; सोपी ट्रिक समजली तर तुम्हाला कोणीच फसवू शकणार नाही

Leave a Comment