Heavy rains – दसऱ्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचे वातावरण तयार झाले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या प्रणालीमुळे राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय हवामान खात्याने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
ओडिशाच्या किनारपट्टीजवळ तयार झालेली ही डीप डिप्रेशन प्रणाली आता जमिनीवर दाखल झाली आहे. या प्रणालीमुळे ओडिशा आणि छत्तीसगड राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून, तिचा थेट परिणाम आता महाराष्ट्रावरही होणार आहे.
Insurance fund | 215 कोटींचा विमा निधी मंजूर; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
हवामान तज्ञांच्या मते, ही प्रणाली पुढे उत्तर-वायव्य दिशेने सरकत असल्याने राज्यात बाष्पयुक्त वाऱ्यांची दाटी वाढली आहे. त्यामुळे पावसासाठी अत्यंत पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
याच वेळी, अरबी समुद्रात गुजरात किनारपट्टीजवळ आणखी एक कमी दाबाची प्रणाली सक्रिय झाली आहे. सोबतच एक पश्चिमी आवर्त देखील उत्तर भारताकडून येत असल्याने या एकत्रित हवामान प्रणालींचा महाराष्ट्रावर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत शुक्रवारी म्हणजे ३ ऑक्टोबर रोजी राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध भागांत पावसाची नोंद झाली आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.
मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, अहमदनगर, सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्यातही हलके ते मध्यम सरी बरसल्या आहेत. कोकण भागातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधेही पावसाचा जोर दिसून आला आहे.
Ladki Bahin Yojana September | सप्टेंबर चे 1500 रुपये ‘या’ तारखेला मिळणार, यादीत नाव पहा
भारतीय हवामान खात्याने ३ ऑक्टोबरसाठी विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. यात नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अमरावती, वाशिम, अकोला आणि बुलढाणा यांचा समावेश आहे.
Land Registration rule| | महाराष्ट्र जमीन खरेदी-विक्रीचा नियम बदलला: तरच खरेदी-विक्री.
या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.