पावसाळ्यात घरी आलेल्या कीटकांना पळवून लावा फक्त 5 रुपयात ‘हा’ सोपा उपाय ठरेल फायदेशीर | How to get rid of bugs in house Fast

How to get rid of bugs in house Fast: पावसाळ्यात कीटकांमुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. या वातावरणात ओल्याव्यामुळे आणि घाणीमुळे कीटकांचा प्रादुर्भाव वाढतो.

घरात येणारे हे कीटक केवळ खूप त्रास देत नाहीत तर यांच्यामुळे आजार पसरण्याचा धोकादेखील असतो. पावसाळ्यात कीटकांव्यतिरिक्त डास, पाली, झुरळ आणि माश्यादेखील घरात येऊ लागतात.

कधीकधी त्या अन्नातही पडतात. तुम्ही या समस्येने त्रासले असाल तर काही सोप्या उपायांनी तुमच्या घरात आलेल्या या कीटकांना सहजपणे हाकलून लावू शकता.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कडुलिंब आणि कापूर वापरा

तुमच्या घरात आलेले कीटक तुम्ही सहजपणे हाकलून लावू शकता. खरंतर, कडुलिंबाच्या पाण्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे डास आणि इतर कीटकांना दूर ठेवण्यास मदत करतात.

तुम्ही त्याचे तेल पाण्यात मिसळून त्याची फवारणी करू शकता. कडुलिंबाची पाने जाळून तुम्ही धूरदेखील करू शकता, यामुळे तुमच्या घरात आलेले कीटक सहज दूर होतील.

बापरे” जालन्यात भर वर्गात शिक्षक गाढ झोपेत; वरीष्ठ येताच धाडकन जागे झाले अन्…संतापजनक VIDEO व्हायरल | School Teacher Viral video

घराबाहेर रोखून ठेवा

पावसामुळे घरात मोठ्या प्रमाणात कीटक येऊ लागतात. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना घराबाहेर रोखू शकता. यासाठी तुम्ही खिडक्या आणि दारांवर जाळीदेखील लावू शकता.

कीटकांना हाकलून लावण्याचा हा एक अति प्रभावी मार्ग आहे. यामुळे घरात ताजी हवा येईलच आणि कीटकही घरात प्रवेश करू शकणार नाहीत.

कापूर वापरा

घरात आलेल्या कीड्यांना पळवून लावण्यासाठी कापूर वापरा. यासाठी कापूर जाळून त्याचा सुगंध घराच्या सगळ्या कोपऱ्यांमध्ये फिरवा. खरं तर कापराचा तीव्र सुगंध कीटकांना पळवून लावण्यासाठी फायदेशीर आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment