IMD Rain Alert:महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा सक्रीय होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. पुणे शहर आणि कोकणात पावसाचा जोर लक्षणीय वाढला असून, अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
बुधवारी रात्री पुण्यात आणि कोकणातील काही भागात जोरदार सरी कोसळल्या. यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला, तरी पुढील काही दिवसांत हवामान आणखी खवळण्याची शक्यता आहे. (Maharashtra Monsoon Update)
शेतजमिनीसाठी वारस नोंद कशी केली जाते? सातबाऱ्यावर नाव येण्यास किती दिवस लागतात? Land Record Ferfar
कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गसह पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक या घाटमाथ्यालगतच्या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
या पावसामुळे घाटमाथ्यावरून येणाऱ्या नद्यांचा विसर्ग वाढणार आहे. पुणे शहरासह खडकवासला धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे पाटबंधारे विभागाने रात्री १२ वाजल्यापासून ६४५१ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. विसर्गाची पातळी पावसाच्या तीव्रतेनुसार समायोजित केली जाणार आहे.
पिक विमा 2025 अर्ज भरण्यास सुरुवात! नवीन शासन निर्णय, सामायिक क्षेत्राच शपथपत्र, पिक पेरा Pdf फाईल येथे डाऊनलोड करा Crop Insurance Online Apply 2025
६ जुलैनंतर राज्यात पाऊस सक्रिय:
हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी सोशल मीडियावर माहिती देताना स्पष्ट केलं की, ६ जुलैपासून कोकण व पश्चिम महाराष्ट्रात पाऊस चांगला सक्रीय होणार आहे.
विशेषतः मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांमध्ये ३ ते ६ जुलै दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला गेला आहे. या कालावधीनंतर मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्येही पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
विदर्भात गुरुवारी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून, काही भागांत ढगाळ वातावरण राहील. मराठवाड्यातील शेतकरी वर्गाला या पावसाची प्रतीक्षा असल्याने, ६ जुल्यानंतर पावसाचा जोर वाढणे ही सकारात्मक बाब मानली जात आहे.