Kitchen Jugaad VIDEO: पावसाळ्यात झोपण्याआधी दरवाजात मीठ नक्की टाका; सकाळी डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Kitchen Jugaad Video: मीठ हा आपल्या रोजच्या जेवणातील सर्वात मुख्य आणि महत्वाचा पदार्थ आहे. मिठाशिवाय चव येऊ शकत नाही. जेवण अळणी असेल किंवा त्यात मीठ कमी असेल तर असे जेवण आपण खाऊ शकत नाही.

जेवणाला स्वाद आणणारे मसाले आणि मीठ हे दोन्ही पदार्थ अतिशय महत्वाचे असतात. यातला एखादा पदार्थ जरी कमी पडला ते जेवण बेचव लागते.

मात्र हे मीठ फक्त जेवणात नाही तर वेगवेगळ्या समस्यांवरही फायदेशीर ठरतंय. कंस? चला जाणून घेऊयात. तुम्ही कधी दरवाजात मीठ टाकलं आहे का? खास करुन पावसाळ्यात दरवाजावर मीठ टाकण्याचा चमत्कारिक फायदा पाहून तुम्हीही यापुढे दरवाजात मीठ टाकाल.

आजपासून दोन दिवस जोरदार मुसळधार पाऊस, IMD ने जारी केला अलर्ट; जाणून घ्या आजचा हवामानाचा अंदाज | IMD Weather Update of 22 june 2025

पावसाळा हा ऋतू हिरवळ आणि थंड वातावरणाने मनाला शांत करतो, तसेच पावसाचे थेंब जेव्हा जमिनीवर पडतात तेव्हा हवामान आल्हाददायक होते.

पण त्याचवेळी वातावरणातील आर्द्रता निर्माण झाले की डास, कीटक, माश्या यांचा त्रास सुरू होतो. या किटकांमुळे आपण आजारी पडण्याचीही शक्यता असते.

तसेच पावसाळ्यात पाण्यात प्रजनन करणाऱ्या डेंग्यू आणि मलेरियाच्या डासांची दहशत दरवर्षी दिसून येते. यामुळे आपल्याला आजार बळावतात, म्हणून आधीच खबरदारी घेणे आवश्यक आहे.

सामान्यपणे मीठ आपण पदार्थात वापरतो. मिठामुळे कोणत्याही खाद्यपदार्थ चव येते. तसं मीठ काही इतर कामांसाठी ही वापरलं जातं. अशाच उपयोगापैकी एका उपयोगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

एका गृहिणीने मिठाचा हा जबरदस्त किचन जुगाड दाखवला आहे. गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात. काही गृहिणी त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतात.

अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा व्हिडिओ. ज्यात तिने मिठाचा अनोखा वापर करून दाखवला आहे. तुम्ही नीट पाहिलं तर दरवाजाच्या खाली किंचितशी जागा असते. जिथून प्रकाश दिसतो.

या ठिकाणाहून बाहेरील एखादा कीटक, किडा किंवा सापासारखा खतरनाक प्राणी घरात घुसू शकतो. जंगलाजवळ राहणार्‍यांना असा धोका अधिक असतो. गृहिणीने व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार दरवाजावर मीठ टाकल्याने असे जीव दरवाजातून घरात येणार नाहीत.

Leave a Comment