कुर्ला रेल्वे स्टेशनवर भयंकर अपघात; रुळाच्यामध्येच पडला अन्… VIDEO पाहून कळेल जीवापेक्षा महत्त्वाचं काहीच नाही.Kurla railway station accident video

Kurla railway station accident video: ‘अति घाई संकटात नेई’ हे वाक्य आपण जवळपास प्रत्येकाने वाचले आहे. कारण- घाई करताना अपघात होण्यापेक्षा संथ गतीने सुखरूप घरी पोहोचलेले बरे, हा या वाक्यामागचा मुख्य उद्देश आहे.

तरीदेखील काही मंडळी या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतात अन् पुढे त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागते. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. रेल्वे रूळ ओलांडू नका. दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी जिन्याचा वापर करा.

तरीही अनेक प्रवासी पूल चढण्याचा त्रास व वेळ वाचविण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जातात; पण अशा आततायी कृतीद्वारे अनेक जण अपघाताला आमंत्रण देतात; तर अनेक जण जीवानिशीही जातात.

असाच एक भयंकर अपघात कुर्ला रेल्वे स्टेशनवर घडला. त्यामध्ये एक व्यक्ती रेल्वेतून खाली पडली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

https://www.instagram.com/reel/DKeP6gkImw1/?igsh=MWxmY215aHA4c3l5Mg==

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन रेल्वे ट्रॅकच्यामध्ये असणाऱ्या गटारात हा व्यक्ती उलटा पडला आहे. यावेळी काही प्रवासी पुढे आले आणि त्या व्यक्तीला नाल्यातून बाहेर काढून लागले. गटाराच्या पाणीही रक्तानं लाल झालेलं दिसत आहे.

हा व्यक्ती ट्रेनमधून पडल्याचं किंवा रुळ ओलांडताना धडक बसली असल्याचं बोललं जात आहे. त्याला डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी प्रवाशांनी उचलून त्याला बाहेर काढलं आणि रेल्वे प्लॅटफॉर्मवर घेऊन गेले.

एवढा भयंकर अपघात पाहून तुम्हीही यापुढे रूळ ओलांडण्याआधी आणि चालत्या गाडीत चढण्याआधी १०० वेळा विचार कराल.

नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी उशीर झालाय आणि तुम्ही जर वेळेत पोहोचण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडण्याचा शॉर्टकट घेत असाल, तर स्वत:ला आवरा आणि थांबा.

कारण- काळ कुणाला सांगून येत नसतो. तो कधीही आपल्या वाटेत येऊन आपला जीव घेऊ शकतो आणि आपल्याला हे सुंदर जीवन जगण्याचा आनंद गमवावा लागू शकतो.

व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

https://www.instagram.com/reel/DKeP6gkImw1/?igsh=MWxmY215aHA4c3l5Mg==

Leave a Comment