Land record  | काकू, जरा हळू… ‘प्यार दिनों का मेला है’, गाण्यावर काकूंनी केला नादखुळा डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक

Viral Video: सोशल मीडियावर अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण रील्सद्वारे आपली कला सादर करताना दिसतात. कधी डान्स तर कधी गाणी, अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता एका महिलेचा डान्स खूप व्हायरल होत आहे, ज्यातील तिच्या डान्सचं नेटकरी भरभरून कौतुक करताना दिसत आहेत.

 

सामान्य कुटुंबातील महिलांच्या आयुष्यातील बराच वेळ त्यांचं कुटुंब, मुलं, नोकरी, घराची जबाबदारी या सगळ्या गोष्टींभोवती फिरत असतो. यापलीकडे जाऊन त्यांना त्यांचा स्वतःचा वेळ फार कमी मिळतो. पण, त्यातूनही काही हौशी महिला एखाद्या कार्यक्रमात डान्स करून आपली आवड पूर्ण करतात. आता अशाच एका महिलेचा डान्स व्हायरल होतोय.

Crop Insurance Application | पंतप्रधान पीक विमा योजना २०२५-२६: रब्बी हंगामासाठी घरबसल्या अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया ! 

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला तिच्या घरामध्ये ‘प्यार दिनों का मेला है’ हिंदी गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. महिलेच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून नेटकरीही तिचं कौतुक करत आहेत. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

 

पाहा व्हिडीओ:

 

Leave a Comment