Viral Video: प्राण्यांचे विविध व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत येत असतात, ज्यात जंगलातील कधीही न पाहिलेले प्राण्यांचे थरारक व्हिडीओ तर कधी प्राण्यांचे मजेशीर व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. माणसांप्रमाणेच प्राणीदेखील आपली भूक भागविण्यासाठी काही ना काहीतरी करतात. अनेकदा जंगलातील वाघ, सिंह, बिबट्या यांसारखे प्राणीदेखील भूक भागवण्यासाठी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात. पण, हल्ली जंगलांची संख्या कमी झाल्यामुळे जंगलातील प्राणी मानवी वस्तीतही शिरकाव करतात. या व्हिडीओत अशीच एक घटना पाहायला मिळत आहे.
Crop Insurance New List | पिकविमा हेक्टरी १८,९०० रुपये मिळणार! यादीत नाव चेक करा
प्राणी असो किंवा माणूस दोघांची आयुष्य जगण्याची पद्धत जरी वेगळी असली तरीही या दोन्ही सजीवांमध्ये पोट भरणे ही एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. यासाठी ते आपआपल्या परीने प्रयत्न करताना दिसतात. आजवर तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील, ज्यामध्ये हिंस्र प्राणी इतर प्राण्यांची शिकार करताना दिसले असतील. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही अशीच एक घटना मानवी वस्तीमध्ये घडल्याचे दिसत आहे.
Maharashtra GR Before Polls |आचारसंहितेपूर्वी २२० जीआर, बदल्यांसह कोट्यवधींच्या निधीची खैरात
वाघ, सिंह, बिबट्या यांसारखे हिंस्र प्राणी अनेकदा मानवी वस्तीमध्ये शिरकाव करून येथील माणसांवर किंवा श्वान, शेळी अशा प्राण्यांवर हल्ला करतात. ही शिकार करण्यासाठी ते रात्रीची वेळ निवडतात. आता व्हायरल व्हिडीओतही एका बिबट्याने अशीच युक्ती आखून शिकार केल्याचे दिसत आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एका घराबाहेर एक कुत्रा झोपला असून बिबट्याची नजर त्याच्यावर पडते. यावेळी बराचवेळ बिबट्या त्या झोपलेल्या कुत्र्याकडे एकटक पाहतो. त्यानंतर अचानक झोपलेल्या कुत्र्यावर झडप घालतो आणि त्याची शिकार करतो.
पाहा व्हिडीओ: