Marriage Dance Viral Video Today: सोशल मीडियावर लग्नातील हटके रील्स, व्हिडीओ व फोटो सतत व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये लग्नातील अनेक गमतीजमती, अनोख्या प्रथा, हटके उखाणे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक भन्नाट व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात नवीन जोडपं एन्ट्री करताना सुंदर डान्स दिसत आहे.
लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात खूप सुंदर आणि आयुष्य बदलणारा क्षण असतो. त्यामुळे या दिवशी वधू आणि वर त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहतील अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. आजपर्यंत अनेक लग्नांमधील काही हटके घटना आपण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या पाहिल्या असतील. आतादेखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात पती-पत्नी सुंदर डान्स करताना दिसत आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नाच्या हॉलमध्ये सर्व पाहुणे मंडळी उपस्थित असून, यावेळी वधू आणि वर एन्ट्री करतात आणि डान्स करायला सुरुवात करतात. नाचता नाचता वर वधूला उचलून घेतो आणि नाचतो. नवरदेवाचा उत्साह पाहून नेटकरी त्याचं खूप कौतुक करताना दिसत आहे.
९ लाख रुपयांच्या वैयक्तिक कर्जावर मासिक EMI किती असेल, नवीन व्याजदर तपासा Personal Loan EMI