संजय गांधी निराधार, अपंग, विधवा, वृद्ध सर्व पेन्शन योजना, हयातीचा दाखला काढा ऑनलाईन, तरच मिळणार पेन्शन niradhar hayat praman patra

niradhar hayat praman patra:केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांच्या हयात दाखल्याबाबत. विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना या योजना राबविण्यात येतात.

केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांच्या हयात दाखल्याबाबत Benediciary Satyapan App विकसित केले आहे.

या App द्वारे केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचे Digital Life Certificate (DLC) म्हणजे हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन ganerate करावयाचे असून generate केलेले प्रमाणपत्र NSAP पोर्टलवर अपडेट होणार आहे.

महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Benediciary Satyapan App बाबतचे user manual या पत्रासोबत जोडून पाठविण्यात येत आहे.

केंद्र शासनामार्फत दिनांक १४ व १५ जुलै, २०२५ रोजी Performance Review Committee (PRC) ची बैठक नवी दिल्ली येथे आयोजित केली असून, सदर बैठकीत Benediciary Satyapan App बाबत आढावा घेण्यात येणार आहे.

त्यानुषंगाने Benediciary Satyapan App च्या सहाय्याने लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्र (Digital Life Certificate) ऑनलाईन generate करण्याची कार्यवाही तात्काळ करावी, ही विनंती.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली  दिलेला व्हिडिओ पहा 

Leave a Comment