Boy Girl Romance Video Bus Stand: सोशल मीडियावर दररोज शेकडो व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण, यावेळी असा एक व्हिडीओ समोर आला आहे की पाहणाऱ्यांचे डोळे खरंच विस्फारले. एखाद्या पार्कमध्ये किंवा हॉटेलमध्ये नव्हे तर एका गजबजलेल्या बसस्थानकावर प्रेमीयुगुलांचा खुल्लमखुल्ला रोमान्स (सार्वजनिक ठिकाणी केलेलं प्रेम प्रदर्शन) पाहून लोक थक्क झाले आहेत.
हा व्हिडीओ दिवसाढवळ्या शेकडो लोकांच्या नजरेसमोर टिपला गेला आहे. बसची प्रतीक्षा करणारे प्रवासी जवळ उभे असतानादेखील या तरुण-तरुणीने लोक काय म्हणतील याची अजिबात पर्वा केली नाही. दोघे इतक्या भावनेने एकमेकांत रंगले की पाहणारे प्रवासीही क्षणभर गोंधळले. या घटनेचा संतापजनक व्हिडीओ व्हायरल होतोय.
Rooftop Solar Scheme | घरावरील सोलर योजना 100% टक्के अनुदान मिळणार आपला करा अर्ज
व्हिडीओत नेमकं दिसतं काय?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये मुलगी पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये तर मुलगा निळ्या शर्टमध्ये दिसत आहे. सुरुवातीला ती मुलाला गमतीदार अंदाजात ‘अरे ओय!’ म्हणत त्याच्या गालावर हलकेच थाप देते त्यानंतर अचानक दोघे एकमेकांच्या मिठीत हरवून जातात. या दरम्यान ते सार्वजनिक ठिकाणी गर्दीच्या बसस्थानकावर असल्याचंही विसरून गेलेले दिसतात.
सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे, या ठिकाणी त्या वेळेस अनेक प्रवासी बसची वाट पाहत उभे होते. काहींच्या चेहऱ्यावर नाराजी तर काहींनी मोबाईल काढून दृश्य कैद करण्याचा प्रयत्न केला. पण, हे जोडपं मात्र स्वतःच्या दुनियेत गुंग होतं.
सोशल मीडियावर लोकांची मिश्र प्रतिक्रिया
हा व्हिडीओ १८ सप्टेंबर रोजी एक्स (माजी ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर @divyakumari या हँडलवरून शेअर करण्यात आला. अवघ्या काही दिवसांतच त्याला तब्बल ४ लाख ६९ हजारांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. कमेंट्स विभागात नेटिझन्सनी संताप, आश्चर्य, खिल्ली आणि हशा अशा सगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एकाने लिहिलं, “आजच्या जनरेशनचं नेमकं चाललंय तरी काय?” दुसऱ्याने टिप्पणी केली, “ही सगळी पाश्चात्य संस्कृतीची देण आहे.” तर एका युजरने थेट संताप व्यक्त करत लिहिलं, “अशा वागणुकीमुळेच मुलं-मुली पालकांचा विश्वासघात करतात.”
Rooftop Solar Scheme | घरावरील सोलर योजना 100% टक्के अनुदान मिळणार आपला करा अर्ज