रेशनकार्डमधून या ग्राहकांची नावे वगळणार; जाणून घ्या सविस्तर! तुमचे नाव यादीत पहा Ration card ineligible list

Ration card ineligible list:शिधापत्रिकेला आधार क्रमांक जोडून त्यानुसारच शिधापत्रिकेवरील नाव योग्य असल्याची खात्री करण्यासाठीची प्रक्रिया अर्थात ई-केवायसीसाठी राज्य सरकारने ३१ मार्चची मुदत दिली होती.

त्यानंतर पुन्हा दोनदा मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत आता ३१ मे रोजी संपणार असून आतापर्यंत राज्यात ७७टक्केच जणांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे.

त्यामुळे उर्वरित सुमारे २३ टक्के ग्राहकांना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी ३१ मेनंतर पुन्हा मुदतवाढ देण्यात येईल का, असा सवाल उपस्थित होत आहे. हा निर्णय सर्वस्वी केंद्र सरकारचा असल्याने मुदतवाढीबाबत अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम आहे.

ई-केवायसी न करणाऱ्यांची शिधापत्रिकेवरून नावे वगळली जाणार आहेत. परिणामी, अशांना धान्य मिळणार नाही, असा इशारा राज्य सरकारने दिला आहे.

५०००mAh बॅटरीसह कॅमेराचा राजा आहे विवोचा अद्भुत स्मार्टफोन, पहा वैशिष्ट्ये आणि किंमत.New Vivo V30 Pro 5G Smartphone

दोनदा मुदतवाढ देऊनही काम राहिले अपूर्णच◼️ ई-केवायसी पूर्ण होत नसल्याने ३१ एप्रिल आणि ३१ मे अशी दोनवेळी सरकारने मुदतवाढ देण्यात आली. तरीही अजून सुमारे २७ टक्के ग्राहकांनी ई-केवायसी केली नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

◼️ सर्वोच्च न्यायालय तसेच केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसी पडताळणी करण्याच्या सूचना यापूर्वीच राज्य सरकारला दिल्या आहेत.

अहवाल काय सांगतो?राज्यात ३० मेच्या अहवालानुसार, रेशन ग्राहकांची एकूण संख्या ६ कोटी ८५ लाख ३६ हजार ५५० इतकी आहे.

त्यातील ५ कोटी २६ लाख ६३ हजार ४६६ ग्राहकांनी (७६.८४ टक्के) ई-केवायसी पूर्ण केले आहे, तर अजूनही १ कोटी ७७ लाख १ हजार ५४९ ग्राहकांचे (२३.१६) ई-केवायसी प्रलंबित आहे.

अपात्र यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment