Ration Card Update:स्वस्त धान्याचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना रेशन दुकानात ‘ई-केवायसी’ची प्रक्रिया करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा पुरवठा विभागाद्वारे वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली आहे.
असे असले तरी सद्यःस्थितीत जिल्ह्यात काही लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया अद्याप पूर्ण केली नसल्याने या लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे.
जिल्ह्यातील रेशन दुकानात
असलेल्या ई-पॉस मशीनवर ही प्रक्रिया केली जाते. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये अपात्र असलेल्या काही नागरिकांद्वारा रेशन धान्याचा लाभघेतला जात असल्याचे शासनाच्या निदर्शनात आल्यानंतर यामध्ये लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्याचे निर्देश शासनाद्वारे देण्यात आले.
मागील वर्षभरापासून जिल्ह्यातील रेशन दुकानांमध्ये ही प्रक्रिया केली जात आहे. शासनाच्या स्वस्त धान्याचा लाभ अपात्र व्यक्तींना मिळू नये, यासाठी ‘ई-केवायसी’ची प्रक्रिया केली जात आहे. वारंवार सूचना दिल्यानंतरही ई-केवायसी न करणाऱ्या लाभार्थ्यांची शिधापत्रिका रद्द होणार आहे.
मुदत संपली, आता शासनच घेणार निर्णय
शासनाने ‘ई-केवायसी’ करण्यासाठी दिलेली मुदत संपली आहे. मात्र रेशन दुकानात ई-केवायसी करण्याची प्रक्रिया सुरूच आहे. ही प्रक्रिया कधीपर्यंत सुरू राहणार, याचा निर्णय शासनस्तरावर घेतला जाणार आहे.
आप्पासाहेब पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी, हिंगोली
तर शिधापत्रिका होणार रद्द
शासनाद्वारे मोफत धान्याचा पुरवठा केला जात आहे. हे रेशनचे धान्य बाजारात विकल्यास संबंधित रेशनकार्डधारकांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच त्या लाभार्थ्यांची शिधापत्रिकाही रद्द करण्यात येणार आहे.
‘ते’ लाभार्थी ठरणार बोगस
रेशनकार्डवर धान्य उचलणाऱ्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी न केल्यास त्यांचे नाव रेशनकार्डवरून रह करण्यात येणार आहे. तसेच त्या लाभार्थ्यांला लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.
तेव्हा ई-केवायसी करून घेणे गरजेचे आहे. ज्यांनी ई-केवायसी केली नाही त्या लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया करण्याचे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा