प्रचंड वेगाने खळखळ वाहणारे पाणी, जीव वाचवण्यासाठी धरपडणारे लोक”; दुगारवाडी धबधब्यावरील थरारक Rescue Viral Video

Rescue Viral Video:पावसाळ्यात निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी मोठया संख्येने पर्यटक धबधबा, डोंगर- गड -किल्ले अशा ठिकाणी भेट देतात. पण काही लोक अशा ठिकाणी योग्य सावधगिरी बाळगत नाही अन् संकटात सापडतात.

उत्साहाच्या भरात अनेकदा लोकांना आपण काय करत आहोत याचे भान राहात नाही त्यामुळे ते स्वत:चा अन् इतरांचा जीव धोक्यात टाकतात. सध्या अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. नाशिकमध्ये एका धबधब्यावर काही लोक अडकल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

नाशिकमध्ये जोरदार पावसामुळे पूरसृदश्य स्थिती निर्माण झाली आहे. गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. दरम्यान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने विसर्ग वाढविण्यात आला आहे.

दरम्यान, रविवारी (ता. ६) रोजी त्र्यंबकेश्वरजवळील दुगारवाडी धबधब्याजवळ अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने १२-१५ जण अडकले होते. वन विभागाने आपदा मित्र, स्थानिकांच्या मदतीने त्यांची सुटका करण्यात आली. दरम्यान या बचाव कार्याचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे.

गुजरातमध्ये पूल मधोमधच कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; भयानक VIDEO होतोय व्हायरल.Gujarat Vadodara Bridge Collapse video

व्हिडीओमध्ये डोंगरावर जोरदार पाऊस झाल्याने दुगारवाडी धरणाचे पाणी वाढल्याचे दिसत आहे. पाण्याचा प्रवाह इतक्या जोरात वाहत आहे की एखादा माणूस सहज वाहून जाईल. व्हिडीओमध्ये काही लोक पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध बाजूला अडकल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. काही लोक त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.. एक झाड पाण्याच्या प्रवाहाच्या मधोमध पडले आहे त्याचा आधार घेऊन लोक दुसर्‍या बाजूला जा आहे. दोन्ही बाजूला उभे असलेले लोक पाण्यात उतरलेल्या लोकांना मदत करत आहे. एकमेकांचे हात पकडून ते लोक हळूहळू दुसर्‍या बाजूला जाताना दिसत आहे. बचाव कार्याचा हा व्हिडिओ पाहून अंगावर काटा उभा राहतो आहे.

nashik.speaks नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हि़डीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,”दुगारवाडी धबधब्यावर १५ ते २० पर्यटक अडकले होते. धरणी कंपवणारा रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडिओ समोर आला असून, पावसामुळे अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने पर्यटक अडकल्याची घटना घडली. सतर्कता आणि सुरक्षिततेचं गांभीर्य पुन्हा अधोरेखित करणारा प्रसंग आहे.धबधब्याचा आनंद जीवावर बेतू नये. सुरक्षित प्रवास करा.”

बँक ऑफ महाराष्ट्र 10 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज देत आहे, ऑनलाइन अर्ज कसा करावा…….! Bank of Maharashtra Personal Loan

Leave a Comment