State Employees Commission Arrears:या राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना 6/7 व्या वेतन आयोगानुसार सुधारित प्रोत्साहन भत्ता लागु ; थकबाकी देण्याचे निर्देश ! परिपत्रक दि.14.07.2025
आदिवासी भागात कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांना प्रोत्साहन भत्ता लागू करण्याबाबत.
संदर्भ:
१) आदिवासी विकास विभाग, निर्णय शासन दिनांक ०५/०२/१९९९.
२) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दिनांक ०६/०८/२००२.
महोदय / महोदया,आदिवासी विकास विभांतर्गत आदिवासी उपयोजना क्षेत्रात कार्यरत असलेल्या अधिकारी /कर्मचारी यांना संदर्भाधीन क्र. २ व ३ येथील शासन निर्णयातील तरतुदींन्वये ६/७ व्या वेतन आयोगानुसार मूळ वेतनाच्या १५% इतका किमान रु. २००/- व कमाल रु. १५००/- दरमहा अदा करण्याच्या अनुषंगाने शासनास प्रस्ताव प्राप्त होत आहेत.
२. आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय दिनांक ०५/०२/१९९९ अन्वये आदिवासी उपयोजना क्षेत्रात कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांना प्रोत्साहन भत्ता अनुज्ञेय करण्यात आला असून, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दिनांक ०६/०८/२००२ अन्वये प्रोत्साहन भत्त्याशी संबंधित सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, प्रोत्साहन भत्ता मूळ वेतनाच्या १५% इतका किमान रु. २००/- व कमाल रु. १५००/- दरमहा या मर्यादेत अनुज्ञेय करण्यात आला आहे.
३. प्रस्तुत प्रकरणी संदर्भाधीन क्र. १ व २ येथील शासन निर्णयातील तरतुदी विचारात घेता, सद्यस्थितीत आदिवासी उपयोजना क्षेत्रातील नक्षलग्रस्त तसेच अतिसंवेदनशील म्हणून घोषित केलेल्या भागात मुख्यालय असलेल्या अधिकारी/कर्मचारी यांना ६/७ व्या वेतन आयोगातील मूळ वेतनावर १५% इतका किमान रु. २००/- व कमाल रु. १५००/- दरमहा या मर्यादेत सुधारित दराने प्रोत्साहन भत्ता अनुज्ञेय करणे आवश्यक आहे.
४. सबब, परि. क्र. ३ येथे नमूद केल्याप्रमाणे संबंधितांना प्रोत्साहन भत्ता अदा करण्याची कार्यवाही करावी तसेच त्याबाबतची थकबाकी देय असल्यास ती नियमानुसार अदा करण्यात यावी, ही विनंती.
महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
