आजच्या सोशल मीडियाच्या काळात टॅलेंट दाखवायला बरेच पर्याय आहेत. कोणताही अडथळा राहिलेला नाही. महागडे कपडे, मोठा स्टुडिओ किंवा भारी सेटअपच असला पाहिजे असे नाही. हे सगळं नसलं तरी मेहनत आणि आत्मविश्वास असेल तर माणूस नक्कीच पुढे येतो, हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे. सध्या सोशल मीडियावर एका साध्या घरात राहणाऱ्या महिलेचा डान्स व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय.
तिचा डान्स, चेहऱ्यावरील भाव आणि एनर्जी पाहून लोक अक्षरशः फिदा झाले आहेत. हा व्हायरल व्हिडीओ नेहा कक्कर आणि टोनी कक्कर यांच्या ‘Balenciaga Gaga’ या गाण्यावर आधारित आहे. या गाण्यावर आतापर्यंत अनेक रील्स बनवल्या गेल्या, पण या महिलेच्या डान्सने सगळ्यांनाच मागे टाकलं आहे. साध्या वातावरणात, कोणतीही सजावट नसताना केलेला हा डान्स लोकांच्या थेट मनाला भिडतोय.
व्हिडीओत एक महिला हळदी-नारंगी रंगाची, हिरव्या काठाची साडी नेसून छप्पराच्या घरात जबरदस्त डान्स करत आहे. तिच्या कपाळावर बिंदी, सिंदूर आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास आहे. तिचे डान्स स्टेप्स अगदी प्रोफेशनल डान्सरसारखे असून, तिचे एक्स्प्रेशन्स पाहून क्षणभरही नजर हटत नाही. घराची परिस्थिती साधी असली तरी तिचा डान्स कुठेही कमी वाटत नाही. उलट, “टॅलेंटला परिस्थितीची गरज नसते” हे ती दाखवून देत आहे.
पाहा व्हिडीओ