Video viral | “मुलींनो प्रेम करताना १०० वेळा विचार करा”; भर रस्त्यात तरुणानं तरुणीसोबत केला धक्कादायक प्रकार; VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का

सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असते. मनोरंजक व्हिडिओशिवाय अनेक सत्य घटनांचे व्हिडिओ देखील पाहायला मिळतात. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडला अमानुष मारहाण केली आहे. प्रेमात माणूस इतर सगळं विसरून जातो, असं म्हटलं जातं. मात्र अनेकदा हे प्रेमच अतिशय भयानक रूप घेतं. अशाच एका तरुणानं भर दिवसा रस्त्यावर तरुणीसोबत अतिशय धक्कादायक कृत्य केल्याच्या किंवा हत्या केल्याच्याही घटना समोर येत असतात. आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून अनेकजणांनी त्या तरुणावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 

एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेली अनेक जोडपी तुम्ही पाहिली असतील. अशी अनेक जोडपी असतात ज्यांना घरातून नात्यासाठी परवानगी नसते. अशावेळी जगाची पर्वा न करता ही जोडपी गुपचूप एकमेकांना भेटतात. मांजर दुध पिताना डोळे बंद करून पिते म्हणून तिला वाटते की मला कोणीही पाहत नाही” मात्र तिला सगळे पाहत असतात. असंच काहीसं या प्रेमात पडलेल्या तरुणाईचं असतं. घरच्यांचा डोळा चुकवून ते एकमेकांना भेटतात खरे पण कधीतरी ते सापडतातच. अशातच जर हे प्रेम चुकीचं वळण घेत असले तर ते वेळीच थांबवलेलं बरं..याचंच एका उदाहरण दाखवणारा व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्याच्या कडेला तरुण तरुणी दिसत आहेत. यावेळी तरुणी प्रचंड घाबरलेली दिसत असून तरुणापासून लांब लांब जात आहे. मात्र तरुण तिच्यावर ओरडत तिला एका जागेवर थांबण्यास सांगत आहे. शेवटी तो तिला थेट अमानुषपणे मारहाण करु लागतो. तरुण संतापलेला असून तो मुलीला विकृतपणे मारत आहे.प्रियकर अतिशय निर्दयीपणे प्रेयसीला कानशिलात लगावतो. त्यानंतर ही तरुणी त्याच्या कानाखाली मारते. यावर तरुणाचा राग अनावर होतो आणि तो पुढे तिला जमिनीवर पाडून लाथांनी जबर मारहाण करतो. तिचे केस ओढच तो तिच्या चेहऱ्यावर आणि संपूर्ण शरीरावर लाथांनी मारतो.

 

पाहा व्हिडीओ

 

 

Leave a Comment