सापाचे नाव एकले तरी अनेकांना घाम फुटतो. सापाची भीती अनेकांना असते. साप या शब्दानेही अनेकांची भीतीने गाळण उडते, तर काही माणसांसाठी साप म्हणजे एकप्रकारे खेळणंच झालं आहे. पण सापांबरोबरचा खेळ कधी जीवघेणा होईल, याचा अंदाज लावता येणार नाही. साप दिसला तर स्वत: काहीही न करता सर्प मित्रांना संपर्क करा असे अनेकदा आवाहन केले जाते. मात्र सर्पमित्र असला तरी समोर शेवटी सापच, अशाच एका सर्पमित्र महिलेवर सापानं जीवघेणा हल्ला केलाय. आता सोशल मीडियावर समोर आलेला व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
सोशल मीडियावर सापांचे व्हिडिओ वारंवार व्हायरल होतात. काही रोमांचक असतात तर काही भयावह असतात. अलिकडचा एक व्हिडिओ इतका भयानक आहे की पाहणारे थक्क झाले. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. व्हिडिओमध्ये साडी नेसलेली एक महिला एका मोठ्या सापाला पकडताना दिसत आहे. सहसा साप पकडण्याचे काम पुरुष किंवा प्रशिक्षित वन कर्मचाऱ्यांकडून केले जाते, परंतु या सर्पमित्र महिलेवरच या सापानं हल्ला केलाय. हा हल्ला साधासुधा नसून सापानं महिलेच्या थेट तोंडाचाच चावा घेतलाय. यानंतर महिला सापाला दूर करण्यासाठी खेचत होती मात्र सापानं आपले दात महिलेच्या गालावर घट्ट रोवले होते.
Crop insurance money | पीक विम्याचे पैसे खात्यात जमा, तुमचा जिल्हा लिस्टमध्ये आहे का?
हा व्हिडिओ ग्रामीण भागातील असल्याचे दिसत आहे. गावकरी घाबरून मागे हटले, पण साडी नेसलेली एक महिला पुढे आली.व्हिडिओमध्ये, तिने सापाची शेपटी काळजीपूर्वक धरली आणि तिच्या सर्व शक्तीचा वापर करून त्याला झुडपातून बाहेर काढले, मात्र शेवटी थोडसं दुर्लक्ष आणि सापानं थेट तिच्यावर हल्ला केला.. काहींनी म्हटले की, “अनेक पुरुषांमध्येही इतके धाडस नसते.” तर काहींनी लिहिले की, “हे महिला सक्षमीकरणाचे खरे उदाहरण आहे.”हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे आणि आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे.
पाहा व्हिडीओ