Viral jugad video: उत्तर भारतात थंडीने चांगलाच जोर धरला आहे. पहाटे धुके, हाडं गोठवणारी हवा आणि एवढ्या थंडीत काम करणं कठीण झालं असताना, अशा थंडीत घराबाहेर पडणं म्हणजे मोठं आव्हानच. मात्र, भारतीय माणूस असं आव्हान सहज पार करतो, कारण त्याच्याकडे आहे एक खास शस्त्र, ते म्हणजे देसी जुगाड. कितीही संकटं आली तरी “काहीतरी मार्ग काढायचाच” ही वृत्ती भारतीयांच्या रक्तातच आहे. सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून लोक थंडी विसरून हसत आहेत आणि म्हणत आहेत – “यालाच म्हणतात देसी जुगाड.”
हा व्हिडीओ थंडीपासून वाचण्यासाठी केलेल्या भन्नाट देसी जुगाडवर आधारित आहे. कडाक्याच्या थंडीत बाईक चालवणं किती कठीण असतं हे सगळ्यांनाच माहीत आहे. हेल्मेट, जॅकेट, मफलर घातल्यानंतरही थोडी हवा अंगाला लागतेच. पण, या युवकाने थंडीवर मात करण्यासाठी अगदी वेगळाच उपाय शोधून काढला आहे.
व्हिडीओत एक तरुण चक्क ब्लँकेट अंगावर घेऊन बाईक चालवत असल्याचं दिसतं. इतकंच नाही तर त्याने हेल्मेटऐवजी थेट प्लास्टिकची बादली डोक्यावर घातली आहे. त्या बादलीतून समोर पाहण्यासाठी बादलीला दोन छिद्र पाडलेले आहेत, ज्यामुळे रस्ता स्पष्ट दिसतो. पूर्ण शरीर ब्लँकेटने गुंडाळलेलं, डोक्यावर बादली आणि हा युवक आत्मविश्वासात चालवत आहे बाईक; हे दृश्य पाहून कोणीही थक्क होईल. थंडीपासून वाचण्यासाठी हा जुगाड जितका मजेशीर आहे, तितकाच धाडसीही आहे.
पाहा व्हिडिओ
Namo Shetkari | नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जानेवारीत जमा होणार!