Viral video | आगामी संकटाची चाहूल… मालकिणीचा जीव वाचवणाऱ्या कुत्र्याचा VIDEO व्हायरल, पाहून थक्क झाले नेटिझन्स

Viral video: कुत्रा हा फक्त पाळीव प्राणी नसतो, तर तो घरचा सदस्य, मित्र व रक्षणकर्ता असतो. माणूस दुःखी असो वा आनंदी कुत्रा नेहमी त्याच्या जवळ असतो. त्याचं प्रेम निरपेक्ष असतं, त्यात स्वार्थ नसतो. म्हणूनच असं म्हटलं जातं, “कुत्रा हा माणसाचा सगळ्यात विश्वासू साथीदार आहे.” सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात एका पाळीव कुत्र्यानं आपल्या मालकिणीचा जीव वाचवून, या नात्याची ताकद सगळ्यांना दाखवून दिली आहे.

Ativrushti Nuksan Bharpai Beneficiary List | अतिवृष्टी नुकसान भरपाई फक्त या तालुक्यात मिळणार; सर्व तालुके यादी पहा 

सोशल मीडियावर सध्या हा हृदयस्पर्शी आणि थरारक व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पुन्हा एकदा सिद्ध करतो की, पाळीव प्राण्यांची निष्ठा आणि त्यांचा समजूतदारपणा अतुलनीय असतो. आपण अनेकदा ऐकतो की, कुत्र्यांना ‘सहावं इंद्रिय’ असतं, जे काहीतरी वाईट घडणार असताना जागृत होतं आणि हा व्हिडीओ त्याचं जिवंत उदाहरण आहे. एका कुत्र्यानं त्याच्या मालकाचा जीव थोडक्यात वाचवला आणि प्रेक्षक हे दृश्य पाहून भावूक झाले.

Namo Shetkari | नमो शेतकरी योजनेच्या हफ्त्याची तारीख जाहीर मिळणार 6000 हजार रुपये 

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये एक महिला तिच्या पाळीव कुत्र्यासह कॅफेबाहेर पदपथावर बसलेली दिसते. दोघेही शांत वातावरणात वेळ घालवत असताना, काही क्षणांतच सर्व काही बदलतं. अचानक कुत्र्याला काहीतरी वाईट घडणार आहे, असं जाणवतं.

 

ती महिला खुर्चीवर बसली आहे आणि तिचा पाळीव कुत्रा तिच्या शेजारी बसला आहे. काही सेकंदांनंतर, कुत्रा अचानक उठतो आणि मालकिणीच्या खुर्चीला जोरात ढकलून, तिला बाजूला ढकलतो. त्याच क्षणी एक कार खूप वेगात येते आणि नेमक्या त्याच ठिकाणी भिंतीवर आदळते, जिथे काही सेकंदांपूर्वी महिला बसलेली होती! हे दृश्य इतकं अचानक घडतं की, व्हिडीओ पाहणारे काही क्षण स्तब्ध होतात. यातून हे स्पष्ट होतेय की, जर कुत्रा काही सेकंद उशिरा आला असता, तर ती महिला वाचली नसती.

 

पाहा व्हिडिओ

 

Leave a Comment