Viral video: हसावे की रडावे ते कळत नाही. सध्या एक असाच अनोखा व्हिडिओ पाहायला मिळत आहे. तसेच सध्या अलीकडे लोकांनी परील बणवण्याचे, सोशल मीडियावर फेमस होण्याचे वेड लागले आहे. काही लाइक्स आणि व्ह्युजसाठी हे रील स्टार किळसवाणा प्रकार करून आता हद्द पार करू लागले आहेत. अशा प्रकारचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, जिथे दोन तरुणींनी रील बनवण्यासाठी अक्षरश: मर्यादा ओलांडली आहे.
सोशल मीडियावर व्हिडीओ आणि रील्स बनवून अनेकांनी आपलं आयुष्य बदललं आहे. आज असे लोक लाखो-कोट्यवधी रुपये कमावत आहेत. पण, व्हिडीओ बनविण्याच्या नादात अनेक जण आपला जीव धोक्यात घालतात. अनेकदा अशा घटना घडल्या आहेत; ज्यात व्हिडीओ बनविताना अनेकांना प्राणसुद्धा गमवावे लागलेले आहेत. रेल्वे रुळांवर, समुद्रात, डोंगरावर, चालत्या ट्रेनमध्ये, चालत्या बाईकवर किंवा कारवर लोक स्टंट व्हिडीओ शूट करताना दिसतात; पण काही वेळा त्याचे त्यांना गंभीर परिणामही भोगावे लागतात. अशाच एका व्यक्तीचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
२१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेला ‘एक दीवाने की दीवानियत’ चित्रपटाने तिकीटबारीवर अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. या चित्रपटामधील गाणीही व्हायरल झाली आहेत. याचपैकी ‘तेरे दिल पे हक मेरा है’ गाण्यावर एका जोडप्याने चक्क गॅसवर बसून व्हिडीओ शूट केला आहे. व्हिडीओमध्ये तरुण किचन ओट्यावरील गॅस शेगडीवर ठेवलेल्या तव्यावर बसला असून तव्याखालील गॅस सुरु असल्याचं दिसत आहे. या तरुणासमोर त्याची जोडीदार त्याला प्रतिसाद देत नाचताना दिसत आहे.
पहा व्हायरल व्हिडिओ