Viral video: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होतात. सापाचे नाव एकले तरी अनेकांना घाम फुटतो. सापाची भीती अनेकांना असते. साप या शब्दानेही अनेकांची भीतीने गाळण उडते. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात बऱ्याचदा प्राण्यांच्या जीवनाशी संबंधित व्हिडिओ देखील शेअर केले जातात. हे व्हिडिओ नेहमीच आपल्याला थक्क करण्याचे काम करतात. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
सध्या सोशल मिडियावर किंग कोब्राच्या शिकारीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात त्याने सापाची शिकार केल्याचे दिसून आले. साप हा जंगलातील विषारी आणि धोकादायक प्राणी मानला जातो. त्याच्याच जातीतला दुसरा प्राणी म्हणजे किंग कोब्रा… व्हिडिओमध्ये किंग कोब्रा सापाला नूडल्यप्रमाणे गिळताना दिसत आहे.साप या सरपटणाऱ्या प्राण्याबद्दल पुराणकाळापासून मानवाला आकर्षण आहे. पौराणिक कथांमध्ये किंवा दंतकथांमध्ये विविध प्रकारचे सापाचे उल्लेख आढळतात. मात्र ओपियोफॅगस प्रकारातला किंग कोब्रा इतर सापांनाही खाऊ शकतो, म्हणूनच तो इतर सापांपेक्षा वेगळा ठरतो. त्याच्या नावाचा अर्थच सापांना खाणारा असा आहे. किंग कोब्रा ज्या सापांची शिकार करतो, त्यात क्रेट आणि इतर कोब्रा असे विषारी साप आहेत.
सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, किंग कोब्रा सापाची शिकार करताना दिसून आला. त्याने आपल्या तोंडात सापाला पकडले असून एका नूडल्यप्रमाणे तो सापाला गिळण्याचा प्रयत्न करत असतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अवघ्या काही सेकंदातच तो सापाला गिळंकृत करुन टाकतो. एका लाकडी पेटीच्या आत किंग कोब्रा बसलेला असतो आणि जमिनीवर पडलेल्या सापाला आपल्या तोंडात पकडून तो आत खेचण्याचा, त्याची शिकार करण्याचा प्रयत्न करत असतो. किंग कोब्राचा ७५ टक्क्यांहून अधिक आहार हा इतर सापांवर अवलंबून असतो. ते लहान अजगरांना आपली शिकार बनवण्याचा प्रयत्न करतात. हा धोकादायक साप १०-१२ फूट लांबीपर्यंतच्या भक्ष्याला सहज गिळू शकतो.
पाहा व्हिडीओ