Viral Video Couple Married Shiv Parvati Mandir At Heavy Snow : खरं तर लग्नानंतर मुलगा आणि मुलगी यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते. त्यामुळे लग्नाचा दिवस दिवस लक्षात राहील यासाठी नवरा-नवरीचे पुरेपूर प्रयत्न सुरु असतात. काही जण ठरवून गोष्टी करतात; तर अनेक जणांच्या जीवनात नकळत गोष्टी घडून येतात. असाच काहीसा क्षण या जोडप्याच्या आयुष्यात आला. लग्नाचा सोहळा सुरू असतानाच अचानक जोरदार हिमवृष्टी सुरू झाली आणि नवविवाहित जोडप्याला आश्चर्य वाटले. त्यामुळे हे लग्न आयुष्यभर लक्षात राहणारं ठरलं.
मेरठमधील एका लग्नाची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. या जोडप्याने उत्तराखंडातील शिव-पार्वती विवाहस्थळ त्रियुगीनारायण मंदिरात लग्नगाठ बांधली. हिमवृष्टीमुळे संपूर्ण परिसर पांढऱ्या शुभ्र बर्फाने झाकला गेला आणि लग्नाचा क्षण अतिशय सुंदर व स्वप्नवत दिसू लागला. हा निसर्गाचा अनपेक्षित आशीर्वाद जणू त्या जोडप्यासाठी खासच होता.
“देवाचा आशीर्वाद मिळाला” (Viral Video)
तुम्ही पाहू शकता बर्फात एकेक पाऊल टाकत नवविवाहित वधू आणि वर मंदिरातून काळजीपूर्वक परतताना दिसत आहेत. बर्फातून अनवाणी चालताना जोडपे तेजस्वी दिसत होते. वधूने पारंपारिक लाल लेहेंगा आणि थंडीचा सामना करण्यासाठी उबदार जॅकेटचा थर घातला आहे. तिच्या मागे चालणारी एक महिला बर्फाच्छादित जमिनीवर आदळू नये म्हणून लेहेंगा उचलताना दिसत आहे. तर नवऱ्याने शेरवानी आणि थंडी वाजू नये हिवाळ्यातील जॅकेट घातलेले आहे.