Waterfall Accident Viral Video “अशी वेळ कोणावरही येऊ नये”, धबधब्यावर गर्लफ्रेंडला प्रपोज करत होता तरुण, अचानक पाय घसरला अन् थेट….थरारक Video Viral

Waterfall Accident Viral Video: धबधब्याच्या ठिकाणी एक तरुण आपल्या गर्लफ्रेंडला प्रोपज करत आहे पण त्याचवेळी असे काही घडते जे पाहून काळजाचा थरकाप उडतो.

पावसाळ्यात अनेक लोक धबधबा, झरा, धरण अशा ठिकाणी भेट देतात, गड-किल्यांना भेट देतात आणि पावसाळी पर्यटनाचा आनंद घेतात. अनेकदा उत्साहाच्या नादात लोक स्वत:चा जीव धोक्यात टाकतात. धबधब्यावर जाऊन व्हिडिओ काढण्याच्या नादात किंवा नको ती स्टंट बाजी करण्याच्या नादात अनेकदा अपघात होतात अन् लोक स्वत:चा जीव गमावून बसतात.

धबधब्यावर होणाऱ्या अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात अशाच एका अपघाताचा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे जो पाहून धक्का बसला आहे. धबधब्याच्या ठिकाणी एक तरुण आपल्या गर्लफ्रेंडला प्रोपज करत आहे पण त्याचवेळी असे काही घडते जे पाहून काळजाचा थरकाप उडतो.

पावसाळ्यात भिंतीवरील किळसवाण्या पाली क्षणात बाहेर! फक्त ‘हे’ घरगुती उपाय करा एक पालही पुन्हा घरात दिसणार नाही | Home remedies to get rid of lizards

अनेकदा आपल्या जोडीदाराला प्रपोज करण्यासाठी लोक हटके कल्पना शोध असतात. आजकाल धबधब्यासारख्या ठिकाणी जाऊन प्रपोज करण्याा ट्रेंड आहे पण अनेकदा प्रत्यक्षात मात्र वेगळेच काहीतरी घडते. काही दिवसांपूर्वी एका जोडप्याचा व्हिडिओ चर्चेत आला होता जो आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज करताना त्याच्या हातातील अंगठी दरीत पडते.

दोन महिलांचं भांडण म्हणजे पाहणाऱ्यांसाठी फ्री टाइमपास…’, भररस्त्यात दोन महिलांचा राडा, एकीनं दुसरीच्या अंगावर चप्पल फेकली अन्… VIDEO पाहाच Viral Video News Update

अंगठी वाचवण्याच्या नादात तो अक्षर: दरीत पडता पडता वाचतो. पुन्हा एकदा अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. गर्लफ्रेंडला धबधब्याच्या ठिकाणी प्रपोज करताना तरुणाचा अचानक पाय घसरतो अन् तो थेट खडकांवरून घसरून पाण्यात पडतो.

तरुणाला दुखापत झाली की नाही याची माहिती अद्याप मिळाली नाही. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या काळजात धस्स होते. जोडप्याचा रोमँटिक क्षण खराब होतो. व्हिडिओ इंस्टाग्रामवर sarcasm_only नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडीओवर कमेंट करताना त्याने मजेशीर कमेंट केली की, “तो प्रेमात पडला आहे’

Protect Crops : वन्यप्राण्यांपासून पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची स्मार्ट युक्ती

Leave a Comment