मराठी महिलांना तोड नाही! नऊवारी नेसून इंग्रजी गाण्यावर केला भन्नाट डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच! Viral Video

Viral Video : नऊवारी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक भाग आहे. कुठलाही कार्यक्रम किंवा समारंभ असू द्या महिला आवडीने नऊवारी नेसतात. नऊवारीवर महाराष्ट्रीयन दागिने परिधान करतात. हा अस्सल मराठी लूक अनेकांचे लक्ष वेधून घेतो. नऊवारीवर लावणी, मराठी गाण्यांवर डान्स तुम्ही अनेकदा बघितला असेल. सोशल मीडियावर अनेक महिला नऊवारी नेसून मराठी गाण्यावर डान्स करताना दिसतात पण तुम्ही कधी नऊवारी नेसून महिलांना इंग्रजी गाण्यावर डान्स करताना पाहिले आहे का? सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये महिलांचा एक ग्रुप इंग्रजी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला महिलांचा एक ग्रुप दिसेल. या महिलांनी नऊवारी नेसली आहे आणि या महिला नऊवारीत खूप सुंदर दिसताहेत. या महिला एका इंग्रजी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्या ‘चीप थ्रिल्स’ या लोकप्रिय इंग्रजी गाण्यावर डान्स करत आहे. हे सियाने गायलेले एक लोकप्रिय इंग्रजी गाणे आहे. सिया ही एक ऑस्ट्रेलियन गायिका आहे. तिचे हे गाणं जगभरात खूप लोकप्रिय आहे. या महिला या गाण्यावर थिरकताना दिसल्या. या महिलांच्या डान्स स्टेप्स पाहून कोणीही थक्क होईल.

शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट ! शेतरस्त्यांसाठी शासनाकडून नवीन नियमावली जाहीर, वाचा सविस्तर | Land Agriculture Way Update

nath_and_heels या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “नऊवारी – चिप थ्रील” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूपच भारी सगळ्या अगदी मस्त करत आहात” तर एका युजरने लिहिलेय, “किती छान, गाणे..ग्रुप..डान्स… एकी आहे. जबरदस्त महाराष्ट्रीयन संस्कृती जपून एवढे सुंदर नृत्य करत आहेत. हॅट्स ऑफ यूपुन्हा पुन्हा पहावासा वाटणारा व्हिडिओ.” आणखी एका युजरने लिहिलेय, “संसाराची जबाबदारी सांभाळून महिला असा आनंद जेव्हा लुटतात तेव्हा यांना कोणी अडवू नये असे वाटतं” एक युजर लिहितो, “मराठी नारी कुठेच मागे नाही. किती पाहिले तरी मन भरत नाहीये. सगळ्या खूप गोड दिसत आहेत.” तर एक युजर लिहितो, “नाद पाहिजे फक्त” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

Kitchen Jugaad VIDEO: पावसाळ्यात झोपण्याआधी दरवाजात मीठ नक्की टाका; सकाळी डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Leave a Comment