तरुणीसोबत नराधमांनी केलं अमानुष कृत्य; मुलींनो रात्री एकटीनं रिक्षाचा प्रवास करण्याआधी ‘हा’ VIDEO पाहाच, पायाखालची जमीन सरकेल Woman Harassment Viral Video

Woman Harassment Viral Video: गेल्या अनेक वर्षांपासून मुलींवर होणाऱ्या अत्याचाराची संख्या वाढतच चाललीय. हल्ली सोशल मीडियाद्वारे आपल्याला अनेक गोष्टींची माहिती मिळते आणि माणूस म्हणून आपण कुठेतरी चुकतोय याची खंत वाटते. आजही देशात महिला असुरक्षित आहेत.

अत्याचार करणारी विकृत माणसं दिवसाढवळ्या उघडपणे फिरतात. भररस्त्यात सगळ्यांसमोर महिलांची छेड काढतात, त्यांच्यावर हल्ला करतात, त्यांना पळवून नेतात.

अशा परिस्थितीत काही मुली आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवतात, तर काही जणी तसाच अत्याचार सहन करत घाबरून शांत बसतात.

सध्या अशीच भयंकर घटना एका तरुणीबरोबर घडलीय ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एका महिलेच भर रस्त्यात अपहरण करतात आणि रिक्षेत बसवून तिला घेऊन जातात.

तरुणीला जबरदस्तीने रिक्षात बसवलं अन्…

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, मध्यरात्री एक महिला रस्त्याच्या कडेला उभी असते. तितक्यात एक रिक्षा तिच्या बाजूला येऊन थांबते.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

रिक्षा थांबताच महिला त्या रिक्षात डोकावून पाहत असते. तितक्यात एक माणूस रिक्षातून उतरतो आणि तिला जबरदस्ती रिक्षात बसवतो. तिला रिक्षात बसवताच रिक्षा चालक रिक्षा चालवायला सुरू करतो. हे अवघ्या काही मिनिटांतच घडतं. दरम्यान, हा धक्कादायक प्रकार नेमका कुठे घडला आहे, हे अद्याप कळू शकले नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @skymediaa_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल ३.९ मिलियन व्ह्यूज आले आहेत. तसंच “तुम्ही जिथे जाल तिथे काळजी घ्या, कारण सध्या सगळीकडे प्राणी आहेत⁠” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.

खरीप पीक विमा 1 जुलै पासून सुरुवात होणार लागणार हे कागदपत्रे Kharif crop insurance

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “आता तुम्ही हेही म्हणूृ शकत नाही की, तिने काय घातले होते?”, तर दुसऱ्याने “तिच्याबरोबर काय झालं असेल, याचा मी विचारही नाही करू शकत” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “हे पाहणे खूप भयानक आणि हृदयद्रावक आहे. ती खूप घाबरली असेल”

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Comment