दोन महिलांचं भांडण म्हणजे पाहणाऱ्यांसाठी फ्री टाइमपास…’, भररस्त्यात दोन महिलांचा राडा, एकीनं दुसरीच्या अंगावर चप्पल फेकली अन्… VIDEO पाहाच Viral Video News Update

Viral Video News Update : काही महिलांना भांडण करायला कारण लागत नाही. त्या कधीही, कुठेही, कोणत्याही कारणावरून वाद घालू शकतात. पण गोची तेव्हा होते जेव्हा एका महिलेसमोर दुसरी महिलादेखील तोडीस तोड वाद घालत असते. कोणत्याही भांडणात जेव्हा दोन्ही व्यक्ती सारख्याला वारख्या असतात तेव्हा तो वाद खूप रंगतो. दिल्ली मेट्रोच काय, तर मुंबईच्या लोकल ट्रेनमधील महिलांच्या भांडणाचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. पण, सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ एका बसस्थानकावरील आहे ज्यात दोन महिला एकमेकांबरोबर भांडण करताना दिसतायत.

दररोज सोशल मीडियावर मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहेत. असे अनेक व्हिडीओ आहेत, जे पाहिल्यानंतर लोकांना हसू आवरत नाही. असे व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक मोठ्यानं हसायला लागतात. अलीकडे असाच एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी झाल्याचे दिसून येते. त्या दोघींची हाणामारी पाहून आसपास उभे असलेले लोकही मजा घेताना दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका बसस्थानकावर दोन अनोळखी महिलांमध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद सुरू होतो. यावेळी दोघीही एकमेकींबरोबर भांडण करतात. दोघीही एकमेकींसमोर उभ्या राहून हातवारे करून भांडतात. त्यानंतर त्यातील एक जण तिथून निघून जाते.

यावेळी त्या महिलेच्या पायातील एक चप्पल दुसऱ्या महिलेच्या हातात आणि दुसरी चप्पल तिच्या स्वतःच्या हातात होती. दुसरी महिला तिच्या मागे मागे जाते आणि तिच्या अंगावर हातातली चप्पल फेकते. यावेळी आपल्या दोन्ही चपला हातात घेऊन ती महिला पुन्हा भांडायला येते. या दोघींची हे भांडण सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @pettaimannan या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत तीन दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत.

Leave a Comment