काकूंच्या डान्सला तोड नाही! हळदीत ‘चोली के पीछे क्या है’ गाण्यावर धरला जबरदस्त ठेका; VIRAL VIDEO एकदा पाहाच Woman Haldi Dance Video

Woman Haldi Dance Video : लग्न हा असा समारंभ असतो, ज्यात जोडप्यासह त्यांचे नातेवाईकदेखील तितकेच आनंदी अन् उत्सुक असतात. या समारंभाआधी मेंदी, संगीत, हळदीचा कार्यक्रम असतो, ज्यात जोडप्यासह नातेवाईक नाचण्याचा आनंद घेतात. या लग्न समारंभादरम्यानचे अनेक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या हळदी समारंभातील काकींच्या डान्सचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून सर्वच जण त्यांच्या डान्सचे कौतुक करतायत.

हळदी समारंभात नाचण्याची एक वेगळी मजा असते. यात घरातील मंडळी जर नाचण्यासाठी हौशी असतील, तर मग काय विचारायला नको, फुल कल्ला असतो. घरातील सर्वच मंडळी नाचण्याचा आनंद घेतात. या व्हिडीओतही नातेवाइकांच्या हळदी समारंभात दोन काकूंनी असा काही जबरदस्त डान्स परफॉर्मन्स केला की, उपस्थित पाहुणेदेखील पाहतच राहिले. त्यांच्या प्रत्येक स्टेप, अदाकारी आणि ठुमके इतके परफेक्ट होते की, व्हिडीओ पाहतानाही त्यांची मेहनत दिसून येतेय.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता ‘या’ दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा! PM Kisan Samman Nidhi Yojana

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, हळदी समारंभात दोन काकू बेभान होऊन नाचताना दिसतायत. यावेळी तिथे उपस्थित असलेले इतर नातेवाईकही त्यांना प्रोत्साहन देताना दिसतायत. या दोन्ही काकूंनी बॉलीवूडच्या प्रसिद्ध चोली के पीछे क्या है या गाण्यावर ठेका धरला होता. यावेळी त्यांनी गाण्याच्या प्रत्येक ओळीवर एकापेक्षा एक भन्नाट स्टेप्स केल्या आणि त्यातील त्यांचे एक्स्प्रेशन्सही जबरदस्त होते. त्यांच्या या अनेकांना थिरकायला लावणाऱ्या डान्सने हळदी समारंभाची रंगत आणखीनच वाढली. दरम्यान, दोघींच्या या डान्सचा व्हिडीओ आता सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होतोय.

काकूंचा हा जबरदस्त डान्स व्हिडीओ didsupermoms_riddhitiwari_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर लोकही एकापेक्षा एक भन्नाट कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, काकींनी या डान्ससाठी खूप चांगली तयारी केली असेल. तर दुसऱ्याने लिहिले की, हा परफॉर्मन्स जबरदस्त होता. तिसऱ्याने लिहिलेय की, काकूंनी एकदम भारी ताल पकडला आहे.

मोठी बातमी ! महाराष्ट्रात लवकरच निवडणुकांचा बिगुल; निवडणूक आयोगाने बोलावली जिल्हाधिकाऱ्यांची बैठक Maharashtra PanchayatRaj Election 2025

Leave a Comment