गुजरातमध्ये पूल मधोमधच कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; भयानक VIDEO होतोय व्हायरल.Gujarat Vadodara Bridge Collapse video

Gujarat Vadodara Bridge Collapse video: गुजरातमधील वडोदरा येथे महिसागर नदीवर बांधलेला पूल मंगळवारी सकाळी कोसळला. अपघाताच्या वेळी वाहने पुलावरून जात होती. पूल कोसळला तेव्हा एकूण पाच वाहने, दोन ट्रक, दोन कार आणि एक रिक्षा नदीत पडली.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.हा व्हिडिओ पाहून तुम्हाला इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल दुर्घटनेची आठवण होईल.

धो धो पाऊस अन् खळखळ वाहणारे पाणी! सातसडा धबधब्यावर अडकले १०-१५ जण; पुढे काय घडलं? थरारक Video Viral |Satsada Waterfall Rescue

काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवर कुंडमळ्यात पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली घडली होती.

हा पूल सुद्धा मुसळधार पावसामुळे कमकुवत झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पूल कोसळताना शूट केलेले व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजात धस्स झाल्याशिवाय राहणार नाही.

कसा कोसळला पूल?

गंभीरा पूल हा महिसागर नदीवर बांधण्यात आला होता, जो वडोदरा आणि आनंदला जोडतो. मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला होता, ज्यामुळे पूल तुटला आणि नदीत वाहून गेला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले.

पूल कोसळल्यामुळे वडोदरा आणि आणंदमधील संपर्क विस्कळीत झाला आहे. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. यानंतर पोलिसांनी वाहतूक वळवली आहे.

काकूंच्या डान्सला तोड नाही! हळदीत ‘चोली के पीछे क्या है’ गाण्यावर धरला जबरदस्त ठेका; VIRAL VIDEO एकदा पाहाच Woman Haldi Dance Video

मिळालेल्या माहितीनुसार गंभीरा पूल तुटला तेव्हा त्यावेळी पुलावर काही वाहने होती. ज्यांची धडक झाली. दोन ट्रक, एक बोलेरो जीपसह चार वाहने नदीत पडली. माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दल पोहोचले आणि गोताखोरांनी लोकांना वाचवण्यासाठी नदीत बचाव कार्य सुरू केले.

https://www.instagram.com/reel/DL4Ml5kz1UN/?igsh=cXFxaGxuaGZoYjlk

Leave a Comment