Snake Monkey Viral Video: भारतामध्ये देवतांसोबतच प्राण्यांनाही विशेष धार्मिक महत्त्व दिलं जातं. हत्तीला गणपतीचं रूप मानलं जातं, नागाला भगवान शंकराचं प्रतीक समजलं जातं, तर माकडाला बंजरंगबली हनुमानाचं रूप मानलं जातं. अनेकदा या प्राण्यांची पूजा देखील केली जाते. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा होते, तर हनुमान मंदिरांमध्ये माकडांचा वावर नेहमीच दिसतो. या धार्मिक श्रद्धांमुळे भारतीयांसाठी प्राणी आणि श्रद्धा यांचं नातं अगदी सहज आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चर्चेत आहे ज्यात एक माकड नागासमोर डोकं टेकवून वंदन करताना दिसत आहे. हे दृश्य पाहून अनेक भारतीय आश्चर्यचकित झाले. अनेकांनी याला साक्षात महादेव आणि बंजरंगबलीची झलक असल्याचं म्हटलं आहे. म्हणूनच हा भावनिक आणि अद्वितीय क्षण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.