Viral Video | बायको सुंदर नव्हती म्हणून नवऱ्याने केलं धक्कादायक कृत्य! अंगावर ५० ठिकाणी चाकूने चटके दिले अन्…, VIDEO पाहून धक्का बसेल

नवरा-बायकोमधील नात्यात प्रेमाबरोबर एकमेकांविषयी आदर असणंही तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळेच प्रेमाची ताकद वाढते आणि संसार सुखाचा होतो. पण, जर तुमचा जोडीदार तुमचा आदर करीत नसेल आणि तुम्हाला वाईट वागणूक देत असेल, तर त्यापेक्षा चुकीचं आणि वाईट काहीच नाही, असे म्हणावे लागेल.

सोशल मीडियावर दर दुसऱ्या दिवशी नवरा-बायकोच्या अनोख्या नात्यासंबंधीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ अगदी आनंद देणारे, तर काही आपल्याला थक्कच करून सोडणारे असतात. सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. नेमकं काय घडलंय, जाणून घेऊ या…

 

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका महिलेच्या शरीरावर खूप जखमा झाल्या आहेत. ती एक एक करून आपल्या शरीरावरच्या सगळ्या जखमा, डाग या व्हिडीओमध्ये दाखत आहे. व्हिडीओच्या कॅप्शननुसार, ती सुंदर नसल्याने तिच्या नवऱ्याने तिचा छळ केला आहे आणि तिला चाकूने अंगावर चटके देऊन तिच्यावर असा अत्याचार केला आहे, असं समजतंय.

 

Leave a Comment